उमेद अभियानांतर्गत खंडाळी येथे ‘माझी पोषण परसबाग विकसन’ मोहिमेला प्रारंभ

उमेद अभियानांतर्गत खंडाळी येथे ‘माझी पोषण परसबाग विकसन’ मोहिमेला प्रारंभ

अहमदपूर (गोविंद काळे) : लातुर जिल्ह्यात महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात उमेद अभियानांतर्गत ‘माझी पोषण परसबाग विकसन’ मोहिमेला प्रारंभ झाला आहे. यासाठी गाव पातळीवर कार्यरत संसाधन व्यक्तींच्या माध्यमातून सेंद्रिय पध्दतीने पोषण परस बागांची निर्मिती तालुक्यात सर्व गावात उमेद महिला बचत गटांच्या महिलांच्या माध्यमातून केली जात आहे. ही मोहीम १५ जून ते १५ जुलै २0२१ या कालावधीमध्ये राबवण्यात येत असून राज्यात २ लाख ६३ हजार २५0 सेंद्रिय पोषण परसबागा तयार केल्या जाणार आहेत या मोहीमे अंतर्गत दि 19 जुन रोजी खंडाळी येथे आहाराचे महत्व समजून सेंद्रिय पद्धतीने भाजीपाल पिकवून आहारात पोषण द्रव्य वाढवण्याच्या हेतूने तालुक्यातील खंडाळी येथे स्वरूपा बाळासाहेब पौळ यांच्या शेतात पोषण परस बाग बनवन्यात येऊन या मोहीमेचा प्रारंभ करण्यात आला .यावेळी प्रमुख मार्गदर्शक नारायण करांडे प्रभाग समन्वयक खंडाळी व खंडाळी प्रभागातील सर्व ICRP ताई कृषी /पशु सखी व इतर कॅडर तसेच परमेश्वर पौळ, बाळासाहेब पौळ आणि सल्लाउद्धीन शेख आदी उपस्थित होते.

About The Author