विजयकुमार कल्याणकर महाराज यांना श्री प्रभू राम प्राणप्रतिष्ठा समारोहाचे निमंत्रण
उदगीर (एल.पी.उगीले) : आयोध्या नगरीमध्ये दि 22 जानेवारी 2024 ला श्री प्रभू राम प्राणप्रतिष्ठा समारोहाचे आयोजन केलेले आहे.त्या प्राणप्रतिष्ठा समारहाचे निमंत्रण श्रीकृष्ण मंदिर महानुभाव संप्रदाय उदगीरचे महंत विजयकुमार कल्याणकर महाराज यांना एड. सुजित देशपांडे विभाग मंत्री, एड. गौरीशंकर कोळखेरे विभाग सहमंत्री, रवींद्र जाधव जिल्हा संघचालक, संतोष कुलकर्णी प्रांत नैतिक मूल्य शिक्षण सहप्रमुख यांनी नुकतेच दिले. विजयकुमार कल्याणकर महाराज हे 25 वर्षापासून उदगीर मध्ये महानुभाव संप्रदाय रुजवण्याचे कार्य करतात. श्रीकृष्ण मंदिराचे ते संस्थापक संचालक आहेत.पंचकृष्णांच्या विचारधारेला रुजवण्याचे कार्य ते अविरतपणे करत असतात. प्रत्येक वर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी, श्री दत्त जयंती, नवरात्र उत्सव असे उपक्रम राबवून महानुभाव संप्रदायाच्या विचाराचा प्रसार आणि प्रचार करण्याचे कार्य ते अविरतपणे करत असतात. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना प्रत्यक्ष आयोध्या या ठिकाणाहून कार्यक्रमाला येण्याचे निमंत्रण देण्यात आले. त्यांच्यासोबत विभाग मठ मंदिर संपर्कप्रमुख ह भ प उद्धव महाराज हैबतपुरे ,सहमंत्री सचिन जळकोटे ,तालुका कार्यवाह डॉ. राजुरकर,प्रखंड मंत्री श्रीपाद करंजीकर यांनाही निमंत्रण देण्यात आलेले आहे. त्यांच्या या निमंत्रणामुळे महानुभाव संप्रदायामध्ये आनंदाचे वातावरण बनलेले आहे. सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.