जरांगे पाटलांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अहमदपूर तालुक्यातून शेकडो वाहने मुंबईकडे रवाना
टप्प्याटप्प्याने वाहनांची संख्या वाढणार
अहमदपूर ( गोविंद काळे ) : मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये नेहमीच सक्रिय असलेल्या अहमदपूर तालुक्यातून मुंबईतील महामोर्चासाठी शेकडो वाहने रवाना झाले यात ट्रॅक्टर टेम्पो ट्रक आयशर छोटा हत्ती पिक अप अश्या वाहनांमधून तरुण, आबालवृद्ध, व महिला असे हजारो समाजबांधव अंतरवली सराठी कडे रवाना झाली आहेत
मराठा आरक्षणाच्या या लढ्या ची नियोजन बध्द अंमलबजावणी करण्यामध्ये नेहमीच अग्रेसर असलेल्या अहमदपूर तालुक्यामध्ये याही मोर्चाचे अत्यंत चांगले नियोजन केले असून येथील समन्वयक समितीने दिनांक 19 रोजी मोटरसायकल रॅली काढून संबंध तालुका पिंजून काढत समाज बांधवांच्या दारोदारी जाऊन या मोर्च्या साठी “चुलीला अवतन” देण्यात आले होते त्याचाच परिपाक म्हणून तालुकभरातून आत्तापर्यंत जवळपास 173 वाहनांची नोंदणी समितीकडे झाली असून यातून 5 ते 6 हजार समाज बांधव अंतरवली सराठी कडे रवाना झाले आहेत
वाहनांची नोंदणी अजूनही चालू असून टप्प्याटप्प्याने जाणाऱ्या समाज बांधवांची संख्या अधिक असून विना नोंदणी ची काही खाजगी छोटी वाहनेही अंतरवेली सराठी कडे रवाना झाली आहेत
दिलेल्या सूचनेप्रमाणे प्रत्येक गाडीमध्ये सात ते आठ दिवस पुरेल एवढे राशन व आवश्यक साहित्य आंदोलकांनी सोबत घेतलेअसूनआता माघार नाही या भावनेने समाज बांधव पेटून उठला आहे काहीही झाले तरी आरक्षण घेऊनच परतणार असल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.