मराठी कादंबरीतून स्त्रियांचे प्रश्न दुर्लक्षितच मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनात परिसंवादातील सूर

0
मराठी कादंबरीतून स्त्रियांचे प्रश्न दुर्लक्षितच मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनात परिसंवादातील सूर

मराठी कादंबरीतून स्त्रियांचे प्रश्न दुर्लक्षितच मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनात परिसंवादातील सूर

अहमदपूर (गोविंद काळे) : स्त्रियांच्या प्रश्नांना ज्याप्रमाणात मराठवाड्यातील स्त्री कांदबरीकारांनी प्राधान्य द्यावयास पाहिजे होते, त्याप्रमाणात ते दिले गेले नाही. अशी खंत शनिवारी (ता.20)  नवव्या मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनातिल ‘मराठी कादंबरी आणि मराठवाड्यातील स्त्री कादंबरीलेखन’ या परिसंवादात व्यक्त करण्यात आली. 

परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी परभणी येथील सावित्री चिताडे या होत्या तर लातूरच्या प्रा.डाॅ.जयदेवी पवार, गंगापूरच्या द्रौपदी पंदीलवाड,नांदेड येथील दीपा बियाणी, गुंजोटीच्या आसिया चिश्ती-इनामदार आणि लासूर स्टेशन येथील शारदा देशमुख यांनी परिसंवादात सहभाग नोंदवला.

प्रा.डाॅ.जयदेवी पवार

मराठवाड्यातील स्त्रियांनी निजामकालीन अन्याय व अत्याचारांना तोंड दिलेले आहे. या बाबीचा उहापोह मराठी कादंबरीतून झालेला आढळून येत नाही.कांही पुरूष कादंबरीकारा बरोबरच स्त्री कांदबरीकरांनी स्त्रियांचे प्रश्न कादंबरीतून मांडले आहेत,परंतू ते अपूरे आहेत.

दीपा बियाणी

मराठी कादंबरीतून स्त्रियांची पारंपरिक प्रतिमा धुसर होत असून,धाडसी स्त्री समोर येते आहे ही आनंदाची बाब आहे.परंतू आधुनिक काळातील स्त्रियांचे प्रश्न अधिक गुंतागुंतीचे होत आहेत.याबरोबरच बलात्कारीत, एड्सग्रस्त,तमाशातील स्त्रियां शिवाय तृतीयपंथींचे प्रश्न मराठी कादंबरीत उमटले नाहीत.

द्रौपदी पंदीलवाड 

मराठवाड्यातील पुरूष कादंबरीकारांच्या प्रमाणात स्त्री कादंबरीकरांनी स्त्रियांचे प्रश्न कादंबरीतून उपस्थित केले नाहीत.याबरोबरच मराठवाड्यातील स्त्री कादंबरीकार ह्या अत्यल्प आहेत.स्त्री शिक्षण,शेतकरी,शेतमजूर,दुष्काळ आदी प्रश्न कादंबरीतून अधोरेखित होणे आवश्यक आहे.

शारदा देशमुख

कादंबरीतून तत्कालीन सामाजिक परिस्थितीचा विचार केला जातो.मराठवाड्यातील कांही स्त्री कादंबरीकारांनी स्त्रियांचे प्रश्न कादंबरीतून मांडले,मात्र ते अपूरे आहेत.

आसिया चिस्ती

मराठी कादंबरीतून रंजकता व कल्पनाविलास रंगवण्यात आला.परंतू यात मराठवाड्यातील ज्वलंत प्रश्न आणि ग्रामीण साहित्यातील वास्तववाद उतरला नाही,हे सत्य आहे. 

सावित्री चिताडे

कादंबरीतून मोठ्या प्रमाणात बोली भाषेचा वापर केला गेला पाहिजे,तरच ती आपलीशी वाटेल.मराठवाडा कादंबरी लेखनात समृद्ध होतो आहे मात्र कादंबरीतून म्हणावे तसे ग्रामीण जीवनाचे व  वास्तववादी चित्रण होत नाही.

परिसंवादाचे सूत्रसंचालन रंजना गायकवाड यांनी केले तर आभार मीना तोवर यांनी मानले.

काॅमरेड श्रीनिवास काळे स्मृती प्रतिष्ठान व मराठवाडा साहित्य परिषदेच्या स्थानिक शाखेच्या वतीने संस्कृती सभागृहात नववे मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. 

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *