बसची वारी आणि लय भारी कथाकथना चा सादरीकरणांने श्रोते झाले मंत्रमुग्ध

0
बसची वारी आणि लय भारी कथाकथना चा सादरीकरणांने श्रोते झाले मंत्रमुग्ध

बसची वारी आणि लय भारी कथाकथना चा सादरीकरणांने श्रोते झाले मंत्रमुग्ध

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील नवव्या लेखिका साहित्य संमेलनाच्या कथाकथन या भागांमध्ये मराठवाड्यातील नामवंत लेखिकांनी आपल्या कथा सादर केल्या.
या कथाकथन सत्राच्या अध्यक्षपदी परभणीच्या लेखिका सरोजा देशपांडे ह्या होत्या.

यावेळी धाराशिवीच्या सुनीता गुंजाळ यांनी आपली
बसची वारी, लय भारी
ही कथा सादर करत हास्यविनोद व सुंदर सादरीकरणाने श्रोत्यांना खळखळून हसवले.
उदगीरच्या सुप्रसिद्ध कवयित्री आणि अनिता यलमोटे यांनी सामाजिक व चुक रुढी परंपरावर आपल्या कथेतून जोरदार प्रहार करताना आपली काकण चोळी ही कथा सादर केली.या कथेमध्ये लेकराला बाप सोडून सगळं मिळेल . काकण चोळी पुरतं माहेरघर असं सांगताना व्यवस्थेतील त्रुटी दाखवल्या.

जालना येथील रत्नमाला मोहिते यांनी आपल्या कथेतून आता रडायचं नाही आता लढायचं कमवा आणि शिका असा संदेश दिला.
यावेळी
पुष्पा दाभाडे यांनीही आपली कथा सादर केली .

या कथाकथन सत्राच्या अध्यक्षपदी परभणी येथील सरोजा देशपांडे ह्या होत्या त्यांनी आपली कच्ची पापड ही कथा सादर करताना हळुवार विषय मांडणी, विनोदातून महिलांना आत्मनिर्भर होण्याचा मार्ग सांगितला अध्यक्ष समो रोपात त्यांनी या संमेलनाच्या सुंदर आयोजनाबद्दल गौरव उ उद्‌गार काढले
या कथाकथन सत्राचे सुत्रसंचालन सुनंदा कुलकर्णी यांनी आभार सय्यद शाहिदा बेगम यांनी मांडले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मराठवाडा साहित्य परिषद मसापा शाखा अहमदपूर कॉ . श्रीनिवास काळे स्मृती प्रतिष्ठान यांनी केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *