“म्हणून तर हिरकण्या होतात कुणब्याच्या पोरी”
अहमदपूरात रंगले चार तास रंगले निमत्रितांचे कविसंमेलन .
अहमदपूर (गोविंद काळे) : नवव्या लेखिका साहित्य संमेलनात दिनांक 21 रोजी सायंकाळच्या सत्रात सहा ते रात्री दहा असा चार तास मराठवाड्यातील नामवंत कवयित्रीने एकाहून एक सरस कविता सादर करत श्रोत्यांना खिळवून ठेवले.
निमंत्रितांच्या या कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध कवयित्री उर्मिला चाकूरकर ह्या होत्या तर या कवी संमेलनाचे बहारदार सूत्रसंचालन कवयत्री अनिता येलमटे यांनी केले.
लातूर येथील कवयित्री शैलजा कारंडे यांनी आपली कविता सादर करताना
बरच काही शिकवत असतात बांधावरच्या बाभुळबोरी,
म्हणून तर हिरकण्या होतात कुणब्याच्या या पोरी
हि कविता सादर करत श्रोत्यांना अंतर्मुख व्हायला भाग पाडले.
यानंतर सत्वशीला कलशेट्टी यांनी
लेक जन्माला येते आणि आई-वडिलांच्या जीवनाला पालवी फुटते
ही सुंदर कविता सादर केली.
अहमदपूर येथील कवयित्री रंजना गायकवाड यांनी
अंधाराला नाही रात, मी सूर्याचा दिस
बाई पणा खास, माझं बाई पण खास
ही आपल्या गोड आवाजात कविता सादर केली.
धाराशिव येथील कवियत्री भाग्यश्री केसकर यांनी
सई सखे तुला काही सांगायचे ग
मला काही बाई तुझ्याशी बोलायचे ग
हे ठेका धरायला लावणारी कविता सादर केली.
कवयित्री श्रेया काळे हिने
तू खूप दूर होतीस ही
कविता सादर करून श्रोत्यांना गंभीर बनवलं
कवयित्री चंद्रमुखी बोळेगावे यांनी
माझा बापही राबतो रात दिस शेतामंदी
ही आपली बहारदार आवाजातील कविता सादर केली.
मनीषा पोतदार यांनी
सांजवेळी होत आहे शांतआता
हे गझल सादर केली
तर कल्याणी राणी देशमुख राजे जाधव यांनी
संघर्ष तुझाच तर जीत ही तुझी
ही कविता सादर केली
विमल मुदाळे यांनी
दुसऱ्यासाठी जगणे आता फार झाले
कल्पनेतही रमणे आता फार झाले
ही गझल सादर केली.
कवयित्री सुमन शेगेदार यांनी
मला वाटते विश्वशांतीचे दूत व्हावे
ही कविता सादर केली
वर्षा लगड माळी यांनी क्रांतीज्योती सावित्री ही कविता सादर केली .
वृशाली पाटील यांनी
गाय हंबरते दारी तान्हा तिचा भुकेला
सय्यद तहसिन यांनी हिरकणी गड सर केलिस ग
ध्यैर्याने
नीता मोरे यांनी
बापू माझा शेतकरी शेतात राबला ही कविता सादर केली ..
तीलत्तमा पत्तकराव
यांनी भेसळीकडून भेसळीकडे
तर मीना तोवर यांनी
तूच जिजाऊ तूच अहिल्या मर्दानी वाली झाशी ग
ही वीर रसातील कविता सादर केली.
सीमा गुंड यांनी आले धावून , वृषाली पाटील यांनी गाय हंबरते दारी , नयन राजमाने यांनी कोर्टांना ओरडलं ,सुनंदा सरदार यांनी मी कोण मी कोण , सारिका लोकरे यांनी गैरसमज ,अर्चना डावरे यांनी व्यतीने व्याकुळ होताना, सुषमा म्हैसकर यांनी जीवनाचा महामंत्र , सिंधूताई दहिफळे यांनी या रोज वादळांना ,यांच्यासह अरुणा दिवेगावकर वैशाली कंकाल रोहिणी पांडे संगीता घुगे . डॉ क्रांती मोरे, दुर्गा राऊत , मनीषा पोतदार, रेखा सूर्यवंशी , सारिका लोकरे , अर्चना डावरे ,माधुरी देवळांणकर, मंगल शेटे सीमा गुंड रंजना कंधारकर यांच्यासह जवळपास 60 कवित्रींनी आपल्या कविता सादर करत स्त्री भावनेचा व विचारांचा तब्बल चार तास जागर केला
कवी संमेलनाचे अध्यक्ष उर्मिला चाकूरकर यांनी आपली
लेखक पुस्तक लिहतो आहे
सध्या मुक्ती संग्रामावर
सादर करत कवी संमेलनाचा समारोप केला संमेलनाच्या सुंदर आयोजना बद्दल अ आयोजकांचे अभिनंदन केले
. कवयित्री अनिता येलमटे यांनी अतिशय सुंदर पद्धतीने या कवी संमेलनाचे सूत्रसंचालन केले.
अहमदपूर येथील जानकर रसिकांनी मोठी उपस्थिती लावत या कवी संमेलनाला भरभरून प्रतिसाद दिला याच्या यशस्वी मा या आयोजनासाठी मराठवाडा साहित्य परिषद , मसाप शाखा अहमदपूर ,कॉ . श्रीनिवास काळे स्मृती प्रतिष्ठान
व अहमदपूर येथील सर्व मसाप सदस्यांनी प्रयत्न केले.
अहमदपूर येथील जाणकार दर्शकांनी या कवी संमेलनाला भरभरून प्रतिसाद देत मोठी उपस्थिती लावली