सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांचा सन्मान व्हावा – डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी
अहमदपूर (गोविंद काळे) : कार्यकर्ता घडण्यासाठी आयुष्यातील किमान पंचविस वर्ष खर्च करावे लागतात तेंव्हा कूठे एक सजग कार्यकर्त्याचा जन्म होतो.समाजातील सर्वच प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी कूठलाही कार्यकर्ता हा आग्रही भूमिका घेत असतो तेंव्हा सामाजिक क्षेत्रात बरोबर विविध क्षेत्रात काम करणाऱ्या अशा कार्यकर्त्यांचा समाजाने सन्मान करावा अशी अपेक्षा युवकनेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी व्यक्त केली.
येथील विश्रामगृह येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते गोपीनाथराव जोंधळे यांच्या अभिष्टचिंतन कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
अध्यक्षस्थानी माजी आमदार रामभाऊ गूंडीले हे होते.या प्रसंगी पूढे बोलताना डाॅ.सिध्दार्थकूमार सूर्यवंशी म्हणाले की,ज्या प्रमाणे एखाद्या बिया पासून अंकुर फूटून नवे झाड तयार होते त्याच प्रमाणे एक कार्यकर्ता घडत असतो.परंतू एखादा कार्यकर्ता पूढे जावू पहात असेल तर सर्व समाज घटकांनी त्याला प्रोत्साहित करून पूढे पाठविले पाहीजे मात्र प्रस्थापीत व्यवस्थेच्या विचारांची माणसं वृक्षरूपी कार्यकर्त्यांचा अंकुर खूडण्याचे पाप करीत आहेत.ही बाब चळवळीतील कार्यकर्त्यांसाठी पर्यायाने चळवळीसाठी घातक आहे.कार्यकर्ता हा गूण दोषासहित स्वीकारून त्याच्यातील चांगल्या गोष्टीचा पूरस्कार करत समाजव्यवस्थेच्यासाठी,प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी त्याचा वापर करून घेणे गरजेचे आहे अशी भूमिका मांडली.तसेच कार्यकर्ता म्हटला की,तो कामासाठी सज्ज असला पाहिजे फक्त नावापुरताच कार्यकर्ता असने हे सूध्दा चुकीचे असल्याचे प्रतिपादन केले.
या प्रसंगी सत्कारमूर्ती गोपीनाथराव जोंधळे,शिक्षक संघटनेचे विभागीय अध्यक्ष बाबासाहेब वाघमारे,रिपाई नेते अरूणभाऊ वाघंबर,पोलिस उपनिरीक्षक प्रभाकर अंधोरीकर, माजी नगराध्यक्ष सरस्वतीबाई कांबळे,संतोष गायकवाड,पत्रकार शिवाजीराव गायकवाड,भिमराव कांबळे,प्रभाकर गायकवाड चिखलीकर आदींनी मनोगत व्यक्त केली.
माजी आमदार रामभाऊ गूंडीले यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना म्हटले की,सर्वच कार्यकर्त्यांसाठी आजचा काळ अतिशय कठीण असून आपल्यातील एकी हीच महत्वाची बाब आहे.आपापल्या मधे स्पर्धा जरूर असावी मात्र सूप्त संघर्ष असता कामा नये.सूप्त संघर्ष हेच आपल्या अधोगतीचे कारण ठरू शकते असे प्रतिपादन केले.
सत्कारमूर्ती गोपीनाथराव जोंधळे म्हणाले की,आंबेडकरी चळवळ मी प्रामाणिक पणे काम करत आलो आहे.मताच्या पेटीतून मी नेता म्हणून पूढे आलो आहे.त्यामुळेच तालूकास्तरावर सक्रीय पणे कार्यरत आहे.भविष्यात याच्या पेक्षा अधिक गतीने काम करून चळवळीतील कूठल्याही कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे थांबण्याची आपली भूमीका आहे.तालुक्याला दिशादर्शक चळवळ असावी यासाठी आपला पूढाकार असणार आहे अशी माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबासाहेब वाघमारे गुरूजी यांनी केले तर आभार रिपाई नेते अरूणभाऊ वाघंबर यांनी मानले.
या प्रसंगी सचिन बानाटे, डाॅ.बालाजी थिट्टे, बजरंग गायकवाड,माधव बनसोडे, बालाजी बनसोडे,पत्रकार गणेश मूंडे, मनोहर गायकवाड, धम्मानंद कांबळे,संतोष गायकवाड, बालाजी थिट्टे, माधव बनसोडे, गौतम बनसोडे, कलीमभाई अहमद, मिलिंद कांबळे, माधवराव रायभोळे आदींची उपस्थित होते.