बदलत्या काळाचे सर्वंकष भान ठेवून जीवनाचा अभ्यास करा – प्रा.ज्ञानेश्वर हंडरगुळीकर
उदगीर (एल.पी.उगीले) : “सध्याच्या संगणकीय युगात मोबाईलद्वारे अभ्यास करण्याची जीवघेणी परंपरा अधिकाधिक वाढली असून ग्रंथ वाचन संस्कृती कडे दुर्लक्ष होत चालले आहे.ग्रंथांचे जेवढे अधिक वाचन तेवढे ज्ञान समृद्ध होते,म्हणून बदलत्या काळाचे भान ठेवून जीवनाचा अभ्यास करा”असे प्रतिपादन सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा.ज्ञानेश्वर हंडरगुळीकर यांनी केले.
उदगीरच्या महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांसाठीच्या आयोजित केलेल्या तालुक्यातील मौजे सताळा येथील विशेष श्रमसंस्कार युवक शिबिरात चौथे पुष्प गुंफताना ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ दीपक चिददरवार, शाम सोनटक्के , इत्यादी उपस्थित होते.पुढे बोलताना ते म्हणाले की,आजच्या विद्यार्थ्यांसमोरची सध्याची आव्हाने खूप मोठी आहेत, म्हणून कर्तव्ये व जबाबदारीची सुयोग्य जाण ठेऊनच भविष्याला सामोरे गेले पाहिजे असेही ते म्हणाले.
त्यांनी त्यांच्या मायच्या डोळ्यात,माय माझी मराठी,आसवांची ठेव यासारख्या निवडक कवितांचे बहारदार सादरीकरण ही केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रमाधिकारी डॉ. होकरणे,डॉ सुनंदा भद्रशेटटे,प्रा.बालाजी कांबळे यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमात शिबिरार्थी व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.