अहमदपुरात लेखिका साहित्य संमेलनाच्या ग्रंथ दिंडीने शहर दुमदुमले

0
अहमदपुरात लेखिका साहित्य संमेलनाच्या ग्रंथ दिंडीने शहर दुमदुमले

अहमदपुरात लेखिका साहित्य संमेलनाच्या ग्रंथ दिंडीने शहर दुमदुमले

9 वे मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनाचा अहमदपुरात शानदार शुभारंभ
कुटुंबामध्ये स्त्रियांना सन्मानाचे स्थान द्या
उद्घाटक प्रतिभाताई शिंदे यांचे प्रतिपादन

अहमदपूर (गोविंद काळे) : स्त्री ही भोगवादी वस्तू नसून ती एक कर्तव्यदक्ष सजनशील असण्याचे सांगून देशामध्ये नवा श्रीवाद निर्माण न करता कुटुंबातील घराघरांमध्ये स्त्रियांना सन्मानाचे स्थान द्या असे आग्रही प्रतिपादन
उद्घाटक तथा जळगावच्या प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभाताई शिंदे यांनी केले.
त्या दि.20 जानेवारी रोजी मराठी भाषा पंधरवाडा सोहळ्याच्या निमित्ताने कॉ. श्रीनिवाजी काळे स्मृती प्रतिष्ठान व मराठवाडा साहित्य परिषद शाखा अहमदपूरच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठवाडा साहित्य परिषदेचे नववे मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या.
यावेळी पुढे बोलताना त्या म्हणाल्या की स्त्री ही मुळात कणखर असून समाजातील प्रत्येक स्त्रीने बोलण्यापेक्षा लिखाणाकडे विशेष लक्ष द्यावं. समाजातील विद्रोहाशी नाते जोडावं, स्त्रियांचा आवाज घरामध्ये दबला जातोय त्यांच्या स्व अधिकारासाठी समाजातील तरुण स्त्रियांनी पुढे यावं, देश आणि विदेशातील स्त्रियांवरील अन्याय अत्याचार नष्ट व्हावे यासाठी स्त्रियांनी सक्षम व्हावे असे जाहीर आवाहन केले.
या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी बीडच्या सुप्रसिद्ध लेखिका एडवोकेट उषाताई दराडे या होत्या. यावेळी मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, उपाध्यक्ष किरण सगर, कार्यवाह दादा गोरे, कोषाध्यक्ष कुंडलिक अतकरे, प्राचार्य डॉक्टर दीपा क्षीरसागर, अहमदपूर शाखेचे अध्यक्ष सत्यनारायण काळे, कार्यवाह हरिदास तंम्मेवार, स्वागताध्यक्ष एडवोकेट ज्योती काळे, कार्याध्यक्ष प्राचार्य रेखाताई हाके पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
या वेळी रामप्रहारी सकाळी सात वाजता ग्रंथ दिंडीचा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून व हिरवा ध्वज दाखवून करण्यात आला.
या ग्रंथदिंडीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राष्ट्रमाता जिजाऊ ,संत जनाबाई, संत मुक्ताबाई, ॉ. आनंदीबाई जोशी, बहिणाबाई चौधरी, झाशीची राणी, किरण बेदी, यांच्यासह क्रांतिकारी महिलांचे वेशभूषा करून हुबेहूब जिवंत देखावे शहराच्या प्रमुख मार्गावरून संत जनाबाई साहित्य नगरीत दाखल झाली.
या ग्रंथदिंडीत महात्मा गांधी महाविद्यालय ,यशवंत विद्यालय, महात्मा फुले महाविद्यालय, संत ज्ञानेश्वर विद्यालय, विमलाबाई देशमुख कन्या विद्यालय, ज्ञानदीप अकॅडमी यांच्यासह शहरातील विविध महिला मंडळांचा सहभाग होता.
ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन माजी अध्यक्षा तथा सुप्रसिद्ध साहित्यिका प्रा. ललिता गादगे यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले.
यावेळी संमेलनाच्या अध्यक्षा सुप्रसिद्ध लेखिका उषा दराडे म्हणाल्या की, फुले शाहू आंबेडकर नसते तर या भारतीय समाजातील स्त्री घडली नसते. सावित्रीच्या कणखर लढ्याने समाजातील स्त्रियांना बळ मिळालं आणि त्या साक्षर झाल्या आणि कुटुंब सांभाळू लागल्या. राजकारण आणि समाजकारण या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत त्यामुळे चांगल्या लोकांनी विशेषता स्त्रियांनी राजकारणामध्ये यावे.
स्त्रीवर संकट आले तरी ती त्या संकटांना खंभीर होऊन लढा देते व समाजामध्ये कनखर उभी राहते. घरामध्ये स्त्रिया व पुरुषांना समान अधिकार द्या. सौंदर्याची व्याख्या बदला सौंदर्य कशात आहे.
स्त्रियां कर्तबगारीमध्ये पुढे असल्याचे सांगून पुरुषापेक्षा जास्तीचे कार्यक्षमता आमच्या माता भगिनी मध्ये असल्याचे सांगितले .
स्त्री हे सर्वच क्षेत्रांमध्ये अतिशय कार्यक्षम रीतीने काम करत असल्याचे सांगून भावाच्या मालमत्तेत समान अधिकार द्या स्त्रियांनी लिहीत झालं पाहिजे अन्यायाच्या विरोधात लढा दिला पाहिजे असे जाहीर आवाहन केले.
याप्रसंगी मराठवाडा साहित्य परिषदेचे विभागीय अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, संमेलनाच्या माजी अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर दीपाताई क्षीरसागर, अहमदपूर शाखेचे अध्यक्ष सत्यनारायण काळे, स्वागताध्यक्ष एडवोकेट ज्योती काळे यांचे मनोगत पर भाषणे झाली.
या सोहळ्याचा शुभारंभ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून करण्यात आला.
या समयी मराठवाडा साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षा प्राचार्य डॉ. दीपाताई क्षीरसागर यांच्याकडून विद्यमान अध्यक्षा एडवोकेट उषाताई दराडे यांना सूत्र देण्यात आली.
सोहळ्याचे प्रास्ताविक मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष सत्यनारायण काळे यांनी परिचय आणि सूत्रसंचालन आशा रोडगे तत्तापुरे यांनी तर आभार प्राचार्य रेखाताई हाके पाटील यांनी मांनले.
या सोहळ्याला आमदार बाबासाहेब पाटील ,माजी राज्यमंत्री मंत्री बाळासाहेब जाधव, भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके पाटील ,साहित्यिक डॉ. ऋषिकेश कांबळे, साहित्यिक भास्कर बडे, साहित्यिक दगडू लोमटे , केंद्रीय कार्यकारणी सदस्य रामभाऊ तिरुके, डॉ. अशोक सांगवीकर, ओम शांती केंद्राचे राजयोगिनी छाया बहेनजी, माजी नगराध्यक्ष अश्विनी कासनाळे, प्राचार्य डॉ.वसंत बिराजदार, डॉक्टर चंद्रकांत उगीले, महेश बँकेचे उपाध्यक्ष निवृत्तीराव कांबळे, डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी, भारतदादा रेड्डी यांच्यासह मान्यवरांची व साहित्यिकांची उपस्थिती होती.
सोहळा यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष सरोजा भोसले, कोषाध्यक्ष संगीता खंडागळे, विमल काळे, प्रा. विद्या बयास, वर्ष माळी, मीना तौर, रंजना गायकवाड, सुनंदा कुलकर्णी, सय्यद शाहिदा बेगम, शकुंतला वाघमारे, श्रेया काळे यांच्यासह मराठवाडा साहित्य परिषदेच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *