रासेयो’ शिबिरातून समर्पित व सेवाभावी युवक घडतो – भारत सातपुते
उदगीर (एल.पी.उगीले) : राष्ट्रीय सेवा योजना शिबिरातून समर्पित व सेवाभावी युवक घडतात, असे मत सुप्रसिद्ध कवी भारत सातपुते यांनी व्यक्त केले. सताळा येथे महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वार्षिक श्रमसंस्कार शिबिराच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव रामचंद्र तिरुके होते. मंचावर प्रभारी प्राचार्य डॉ.आर.के.मस्के, उपप्राचार्य डॉ.एस.जी.पाटील, सरपंच वाघंबर तिरकोळे, उपसरपंच सचिन सुडे, काशिनाथ पाटील, माजी सरपंच जळकोटे यांची उपस्थिती होती.सातपुते म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास होतो. देशाच्या जडणघडणीत युवकांचे योगदान महत्त्वाचे आहे.
तिरुके म्हणाले की, विकसित भारतात कौशल्यपूर्ण युवकाची महत्त्वाची भूमिका असणार आहे. हे युवक अशा शिबिरातूनच घडत असतात. प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य डॉ.आर. के.मस्के यांनी केले. कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.बी.एस.होकरणे यांनी शिबिराचा अहवाल सादर करून महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी, शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक तथा सर्व शिक्षक, समस्त सताळा ग्रामस्थ आणि विद्यार्थी यांचे आभार मानले.