उदगीर व जळकोट तालुक्याचा एम.आय.डी.सीचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार – ना.बनसोडे

0
उदगीर व जळकोट तालुक्याचा एम.आय.डी.सीचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार - ना.बनसोडे

उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर व जळकोट तालुक्यात उद्योजकांची जमीनीसाठी मोठ्या प्रमाणात मागणी असुन. या दोन्ही ठिकाणी एमआयडीसी निर्मितीसाठीच्या प्रस्तावाला गती द्यावी असे निर्देश क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री तथा परभणीचे पालकमंत्री संजय बनसोडे यांनी दिले.

उदगीर एमआयडीसी साठी जागा अंतीम करण्यात आली असुन सदर प्रस्ताव उच्चस्तरीय समितीकडे पाठविण्यात आला आहे. पुढील आठवड्यात याला मान्यता मिळून कामास गती देता येईल. त्याचबरोबर जळकोट येथे एम आय डी सी साठी जागा एम आय डीसीच्या पथकाने पाहणी केली आहे. याठिकाणी एम आय डी सी पर्यंतचा मुख्य रस्ता जिल्हा प्रशासन करून देईल. या दोन्ही एम आय डी सी ची कामे तातडीने मार्गी लावावित अशा सूचना त्यांनी एम आय डी सी मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन शर्मा यांना ना.बनसोडे यांनी बैठकीत केल्या आहेत.

मतदार संघात एम.आय.डी.सी लवकर झाली तर या भागातील उद्योजकांना उद्योग मिळेल व उद्योगाबरोबरच मतदार संघातील बेरोजगार तरूणांना काम मिल्याने शेकडो कुटुंबांचा उदरनिर्वाह भागणार असल्याने या भागातील एम.आय.डी.सीचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यासाठी ना.संजय बनसोडे हे प्रयत्नशील आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *