भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सुभाषचंद्र बोस एक अग्रणी नेतृत्व उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी यांचे प्रतिपादन
अहमदपूर (गोविंद काळे) : सुभाष चंद्र बोस यांचा जन्म ओरिसातील एका मोठ्या बंगाली कुटुंबात झाला होता. भारतीय नागरी सेवा परीक्षा देण्यासाठी त्यांना इंग्लंडला पाठवण्यात आले. त्यात ते यशस्वी झाले. महात्मा गांधी आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्यात त्यांचा अनमोल वाटा होता म्हणून विद्यार्थ्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी सुभाष चंद्र बोस यांचा आदर्श घ्यावा असे प्रतिपादन महात्मा फुले वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.दुर्गादास चौधरी यांनी केले.
दि. 23 रोज नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात यशवंत विद्यालयाच्या सभागृहात बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य गजानन शिंदे, विचारपीठावर प्रमुख अतिथी म्हणून लातूर जिल्हा परिषदेचे लेखाधिकारी श्री वसंतराव जाधव, लिपिक लिंगराम पालटवाड ,पर्यवेक्षक राम तत्तापुरे, कार्यालयीन अधीक्षक सोमनाथ स्वामी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी उपप्राचार्य डॉक्टर दुर्गादास चौधरी पुढे बोलताना म्हणाले की नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना करून तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा अशी ते गर्जना करत असत.
कार्यक्रमाचा शुभारंभ नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करून व त्यांना अभिवादन करून करण्यात आला.
यावेळी लेखाधिकारी श्री वसंतराव जाधव यांचे मनोगतवर भाषण झाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक राम तत्तापुरे यांनी सूत्रसंचालन कपिल बिराजदार यांनी तर आभार धनंजय तोकले यांनी मांनले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.