अहमदपूर येथे भारतीय जनता पार्टीचे सोशल मीडिया प्रशिक्षण शिबिर संपन्न

0
अहमदपूर येथे भारतीय जनता पार्टीचे सोशल मीडिया प्रशिक्षण शिबिर संपन्न

अहमदपूर येथे भारतीय जनता पार्टीचे सोशल मीडिया प्रशिक्षण शिबिर संपन्न

अहमदपूर (गोविंद काळे) : भारतीय जनता पार्टी सोशल मीडिया प्रशिक्षण शिबिर बालाघाट पॉलिटेक्निक कॉलेज रुद्धा अहमदपूर येथे संपन्न झाले .यावेळी शिबिरास भारतीय जनता पार्टीचे सोशल मीडिया सेलचे महाराष्ट्र प्रदेश संयोजक प्रकाश गाडे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे विचार तसेच माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी केलेल्या विकास कामे या मुद्द्यावर सर्व कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर आपली बाजू ठामपणे मांडावी तसेच कुठल्याही भूलथापा आणि अफवांना बळी न पडता आपली बाजू भक्कमपणे सोशल मीडियावरती मांडावी असे प्रतिपादन सोशल मीडिया असेल चे प्रदेश संयोजक प्रकाशजी गाडे यांनी केले. जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख तसेच भाजपा प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाके पाटील भाजपा जिल्हा सरचिटणीस भारत चामे यांनी मार्गदर्शन केले .यावेळी भारतीय जनता पार्टी अहमदपूर चाकुर विधानसभा संयोजक पदी नंदकुमार पोले यांची निवड करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख ,भाजपा प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाके ,जिल्हा सरचिणीस भारत चामे, जिल्हाउपाध्यक्ष गोविंद गिरी बालाजी सारोळे,तालुकाध्यक्ष प्रताप पाटील अहमदपूर, सरचिटणीस माणिक नरवटे , तालुका उपाध्यक्ष परमेश्वर पाटील, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष रामानंद मुंडे.शहराध्यक्ष सुशांत गुनाले, महिला मोर्चा अध्यक्ष जयश्री केंद्रे.महीला मोर्चा लातूर जिल्हा सरचिटणीस प्रनिता बेबडे.लोकसभा विस्तारक सिध्देश्वर पवार ,विधानसभा विस्तारक चंद्रशेखर डांगे,ओ बी सी मोर्चा तालुका अध्यक्ष दत्ता खंदाडे.निमत्रण सदस्य महाराष्ट्र प्रदेश दता जमालपुरे, महाराष्ट्र प्रदेश निमंत्रण सदस्य बाळासाहेब होळकर,मानसी हाके, अनुसूचित जाती जमाती अध्यक्ष रामनाथ पलमटे , तालुका सरचिटणीस राम चव्हाण.तालुका उपाध्यक्ष पद्मा वाघमारे.नवनाथ येरमे.रविशकर स्वामी.अशोक शेळके , तानाजी पाटील.मनीषा गगने किरण ठाकूर.पाचाळ ताई व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *