श्रीरामाच्या दरबाराची यशस्वी सांगता,लाखो रामभक्तानी घेतले दर्शन

0
श्रीरामाच्या दरबाराची यशस्वी सांगता,लाखो रामभक्तानी घेतले दर्शन

श्रीरामाच्या दरबाराची यशस्वी सांगता,लाखो रामभक्तानी घेतले दर्शन

अहमदपूर (गोविंद काळे) : संपूर्ण देशभर 22 जानेवारी 2024 रोजी रामलीला उत्सव साजरा केला असून दिवाळी साजरी झाली. लातूर लोकसभा मतदारसंघाचे दानशूर तथा लोकप्रिय खासदार सुधाकरराव श्रृंगारे यांच्या पुढाकारातून अहमदपूर येथे श्रीरामाच्या दरबाराच्या प्रतिकृतीचे होमहवन करून विधीवत पुजन करून खासदार सुधाकरराव श्रुगांरे यांच्या हस्ते 19 जानेवारी रोजी लोकार्पण झाले होते.
19 जानेवारी ते 23 जानेवारी या कालावधीत महीला, पुरुष,बालगोपालानी सरासरी पाच लाख रामभक्तांनी श्रीरामाच्या दरबारात हजेरी लावली होती. 22 जानेवारी रोजी पाच हजार फुगे आकाशात सोडून एक तास अतिषबाजी करुन आनंद उत्सव साजरा करण्यात आला. अयोध्या येथील श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठाचा कार्यक्रम लाईव्ह येथे दाखवण्यात आला. या अभुतपूर्व श्रीरामाच्या दरबारामध्ये पाचशे रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे.लातूर लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय तथा दानशूर खासदार सुधाकरराव श्रुगांरे यांच्या पुढाकाराने व त्यांचे सुपुत्र शंकर भैय्या श्रुगांरे यांच्या संकल्पनेतून उभा केलेल्या श्रीरामाच्या दरबाराची जागतिक वल्ड आफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे.
21 जानेवारी रोजी
राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज भक्तीस्थळाचे प्रमुख आचार्य गुरुराज स्वामी यांच्या हस्ते विधीवत पुजन करून आरती करण्यात आली होती.
अहमदपूर शहरातील थोडगा रोडवरील निजवंते नगर मधील भव्य प्रांगणात श्रीराम, लक्ष्मण, सिता, हनुमान यांच्या भव्य दिव्य दोन लाख तिस हजार पणत्यामध्ये प्रतिकृती उभारण्यात आल्या आहेत. सदरील श्रीरामाच्या दरबाराच्या प्रतिकृती उभ्या करुन अहमदपूर सह लातूर जिल्ह्यातील राम भक्तांचा खासदार सुधाकरराव श्रुगांरे यांनी आनंद द्विगुणित केला आहे. सदरील श्रीरामाच्या दरबाराच्या आरतीवेळी आचार्य गुरुराज स्वामी यांच्या सह
माजी मंत्री बाळासाहेब जाधव,भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष दिलीपराव देशमुख,भाजपाचे प्रदेश प्रवक्ते तथा अहमदपूर विधानसभा निवडणुक प्रमुख गणेश दादा हाके पाटील,माजी नगराध्यक्ष भारत भाऊ चामे, माजी सभापती अशोक काका केंद्रे ,सेवानिवृत्त मुख्याध्यापक देवेंद्र देवणीकर, पोलीस उपअधीक्षक मणिष कल्याणकर, पोलीस निरीक्षक सुधाकरराव देडे,नगर परिषदेचे मुख्याधिकारी काकासाहेब डोहीफडे, शिवानंद हिंगणे,माजी नगराध्यक्ष सौ. अश्विनीताई कासनाळे,कु.मानसी हाके,भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद गिरी, ओमभाऊ पुणे,श्रीकांत देशमुख,तालुका अध्यक्ष प्रताप पाटील, धैर्यशील देशमुख,डाॅ.सिद्धार्थ सुर्यवंशी,
युवामोर्चाचे रामानंद मुंडे शहराध्यक्ष सुशांत गुणाले, ओमकार पुणे,निखील कासनाळे,अमित रेड्डी,वैधकिय अधिक्षक डॉ.सुरजमहल सिहांते,डॉ.अमृत चिवडे,नगरसेवक अभय मिरकले,रवि महाजन,संदीप चौधरी,बाळासाहेब आगलावे,नंदकिशोर कोणाले,माणीक नरवटे,महेद्रं खंडागळे,जुगलकिशोर शर्मा, संतोष कोटलवार,संजय माने, प्रशांत शिंदे,महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्षा जयश्री केंद्रे,शहराध्यक्षा कल्पना महाजन,जिवण गायकवाड,पिंठू नाईक,नारायन केरले,यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते व लाखो महिला पुरुष रामभक्त यावेळी उपस्थित होते.
सदरील श्रीरामाच्या दरबाराची यशस्वी सांगता समारोप प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रा. उमाकांत होणराव यांचे व्याख्यान झाले.
महाआरती नंतर उपस्थित रामभक्तांना श्रीरामाच्या प्रतिकृती मधील दोन लाख तीस हजार पणत्यांचे वाटप करण्यात आले.
सांगता कार्यक्रमाचे आभार भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद गिरी यांनी मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *