राजभाषा मराठीचा विद्यार्थ्यांनी अत्यंत चिकित्सकपणे मराठी भाषेचा अभ्यास करावा
आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते देवेंद्र देवणीकर यांचे प्रतिपादन
अहमदपूर (गोविंद काळे) : मराठी ही आपली मायबोलीची भाषा असून केंद्र व राज्य शासनाच्या आख्यारातील सर्व कार्यालय, मंडळ, महामंडळे सार्वजनिक उपक्रम सर्व खाजगी व व्यापारी बँका सर्व शैक्षणिक संस्था, विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये मराठी राज भाषेचा अत्यंत चिकित्सकपणे मनन चिंतन करून अभ्यास करावा असे आग्रही प्रतिपादन महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते तथा सेवानिवृत्त मुख्याध्यापक देवेंद्र देवणीकर यांनी केले.
ते दिनांक 25 रोजी यशवंत विद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी टागोर शिक्षण समितीचे सचिव शिक्षण महर्षी डी बी लोहारे गुरुजी, विचारपीठावर प्राचार्य गजानन शिंदे, पर्यवेक्षक राम तत्तापुरे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.यावेळी अध्यक्ष समारोपप्रसंगी शिक्षण महर्षी डी बी लोहारे गुरुजी म्हणाले की शाळेसह आपल्या परिवारामध्ये मराठी भाषेचा जाणीवपूर्वक वापर करावा असे याप्रसंगी सांगितले. कार्यक्रमाचा शुभारंभ सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक राम तत्तापूरे यांनी सूत्रसंचालन के डी बिराजदार यांनी तर आभार राजेश कज्जेवाड यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.