इंधन अमूल्य आहे, त्याचे सर्वांनी बचत करावे – उप विभागीय अधिकारी प्रविण फुलारी
अहमदपूर (गोविंद काळे) : यशवंत विद्यालय अहमदपूर येथे ‘सक्षम’ संरक्षण क्षमता महोत्सव – २४ आयोजित करण्यात आले. इंधन अमूल्य आहे, त्याशिवाय आपण आपल्या जीवनाची कल्पनाही करू शकत नाही, म्हणून प्रत्येकाने इंधनाच योग्य वापर करण्याचे आवाहन प्रविण फुलारी यांनी युवा कार्यक्रमात केले. सौर ऊर्जा वापरून विद्युत क्षेत्रात आत्मनिर्भर होऊ शकतो परंतु आपण इंधन बचतीसाठी जनजागृती करणे अतिआवश्यक असल्याचे मनोगत कार्यक्रमात व्यक्त केले. ऊर्जा लेखापरीक्षक केदार खमितकर यांनी प्रत्येक दिवशी विद्युतचे एक युनिट, प्रत्येक महिन्यात एक लिटर पेट्रोल वाचविण्याचे उद्धिष्ट शालेय विद्यार्थीं – विद्यार्थींनीना दिले.ते म्हणाले की ऊर्जेचा वापर कमी केल्याने देशाच्या अर्थव्यवस्थेला दिलासा मिळेल कारण पेट्रोलियम उत्पादने आयात करणे हे देशाच्या संसाधनांचा अपव्यय आहे. कार्यक्रमात तहसीलदार शिवाजी पालेपाड, नायब तहसीलदार मुनवर मुजावर, मुख्याध्यापक जी.आर शिंदे, उपप्राचार्य सय्यद एम.यू., उप मुख्याध्यापक राजकुमार घोटे, पर्यवेक्षक अशोक पेद्देवाड, रामलिंग ततापुरे, राजयोगिनी ब्रह्माकुमारी छाया दीदी यांची प्रमुख उपस्थिती होती.शालेय परिसरात ‘सक्षम २४’ च्या जनजागृती पोस्टरचे अनावरण करण्यात आले. केंद्रीय पेट्रोलियम आणि प्राकृतिक गैस मंत्रालय द्वारा संपूर्ण भारतात इंधन बचत आणि हरित पर्यावरणाचा संदेश पोहोचवण्याचा ‘सक्षम २४’ मोहिमेचा उद्देश आहे. देशव्यापी मोहिमेमध्ये सायक्लोथॉन, सायकल डे, वाहनचालकांसाठी कार्यशाळा, गृहिणी साठी इंधन बचत कार्यशाळा घेण्यात येत असल्याचे कार्यक्रमात सांगण्यात आले. दीपप्रज्वलन करून सक्षम युवा कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.समारोप इंधन बचत प्रतिज्ञेने कलाध्यापक महादेव खळुरे यांनी केली. प्रास्तविक गौरव चवंडा तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाँ शरद करकनाळे यांनी केले आणि आभार रामलिंग तत्तापुरे यांनी मानले.