उदगीर व जळकोट तालुक्यातील अवैध धंदे तात्काळ बंद करा, या मागणीसाठी प्रहारचे पुंगी बजाव आंदोलन
उदगीर (एल.पी.उगीले): येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रहार जनशक्ती च्या वतीने पुंगी वाजवून प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने निषेध करण्यात आला.
उदगीर व जळकोट तालुक्यातील अवैध धंदे तात्काळ बंद करणे बाबतचे निवेदन अनेक वेळा देऊन ही
उदगीर व जळकोट तालुक्यातील अंवेध धंदे बंद होत नाहीत, सर्व सामान्य जनतेचे संसार उध्वस्त करणा-या अवैध धंदे विषयी उदगीर व जळकोट शहरी व ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरु असून ते उदगीर व जळकोट तालुक्यातील संबंधीत पोलीस स्टेशनअंतर्गत येणा-या भागात प्रामुख्याने मटका, जुगार, अवैध दारु विक्री, हातभट्टट्टी दारु, राशनधान्य काळया बाजारात विकणे, अवैध गुटखा,अवैध प्रवासी वाहतूक, ऑनलाईन लॉटरी, अवैध वृक्षतोड, वैश्या व्यवसाय, अवैध वाळू उपसा, अवैध राज्य गोणखणीज उपसा,असे अनेक अवैध धंदे मोठया प्रमाणात उदगीर व जळकोट तालुक्यात सुरु आहेत, यामुळे उदगीर व जळकोट तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात चोरी, डाके, मारहान, महीलांची छेडछाड, कौटुंबीक कलह, गावातील भांडणे आदी प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले असून उदगीर व जळकोट तालुक्यात कायदा व सुव्यवस्था,शांतता भंग पावली आहे, या संदर्भात उदगीर व जळकोट तालुक्यातील अवैध धंदे चालविणा-यावर प्रशासन स्तरावरुन कार्यवाही करुन संबंधीत पोलीस अधिकाऱ्यांना आदेशीत करावे.असे निवेदन दि.7/9/23 रोजी उपजिलाधिकारी यांना दिले होते.त्या वेळी त्यांच्या कार्यालयातून निवेदनाची दखल घेत दि. 21/9/23 रोजी संबंधित अधिकारी यांना नियमानुसार कार्यवाही करण्यात यावी, असे पत्रक काढले असताना देखील सदरील पत्रकाला केराची टोपली दाखवली.कोणतीच कारवाई केली नाही. किंवा दखलही घेतली जात नाही. त्या अधिकाऱ्यांची चौकशी करुन नियमानुसार कार्यवाही करण्यात यावी.या मागणीसाठी दि.25 जानेवारी रोजी उपजिल्हाधिकारी कार्यालया समोर पुंगी बजाव आंदोलन प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आले.
या प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे उपजिल्हा प्रमुख विनोद तेलंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पुंगी बजाव आंदोलन करून संबंधित पोलिस प्रशासन व वरीष्ठ अधिकारी व दारुबंदी अधिकारी यांचा पुंगी वाजवून निषेध करण्यात आला.हे अवैध धंदे बंद करावेत अशी मागणी केली. व संबंधित अधिकारी, पोलिस प्रशासन यांना आपल्या स्तरावरुन त्वरीत अवैध धंदे करण्यासाठी आदेशीत करावे व यासाठी संबंधीत अवैध धंदेवाल्यांना अभय देणा-या पोलीस अधिकारी व राज्य उत्पादक अधिकारी यांचीही सखोल चौकशी करुन तात्काळ कार्यवाही करावी. अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
येत्या दहा दिवसांत सर्व अवैध धंदे तात्काळ बंद करा नाही झाले तर या पेक्षा मोठया स्वरूपात तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा प्रहार चे उपजिल्हा प्रमुख विनोद तेलंगे यांनी दिला आहे.यावेळी जिल्हा अध्यक्ष राजा भाऊ चौगुले ,जिल्हा उपाध्यक्ष विनोद तेलंगे,जिल्हा प्रवक्ते बंडेपा पडसलगे, तालुका अध्यक्ष रविकिरण बेलकुंदे, शहर अध्यक्ष महादेव मोतीपवळे, जळकोट प्रहार अपंग क्रांती अध्यक्ष माधव होणराव, उपाध्यक्ष नामदेव केंद्रे,तालुका कार्याध्यक्ष महादेव आपटे, जिल्हा संघटक संभाजी केंद्रे,महिला जिल्हा उपाध्यक्षा प्रेमलता भंडे, महिला अध्यक्ष विजयमाला पवार,शहर अध्यक्ष राजश्री पाटिल, तालुका सचिव अविनाश शिंदे,तालुका उपाध्यक्ष संदीप पवार,तालुका संघटक सोपान राजे, शहर कार्याध्यक्ष शाहाजान शेख ,शहर उपाध्यक्ष मोहम्मद चौधरी, तालुका चिटणीस बळीराम चौधरी ,शहर सचिव बालाजी बिरादर ,तालुका प्रसिध्दीप्रमुख अभय कुलकर्णी, तालुका संघटक आनंद गव्हाणे ,तालुका सरचिटणीस श्रीदेवी बिरादर, तालुका सरचिटणीस सुदर्शन सूर्यवंशी, महिला प्रहार सेवक रेखाताई, शहर उपाध्यक्ष इमरान शेख, शहर संघटक मधुकर गायकवाड,शहर सहसंपर्क प्रमुख शोएब शेख,रेखाताई, सुल्तान कादरी, मुस्सा कादरी,सुहेल कादरी,परवेज कादरी, रवि आदेपा, , बळीराम चौधरी,निळकंठ मुधोळकर, करडखेल शाखा प्रमुख स्वामी रामेश्वर , तात्याराव घोटमुकले, चंद्रकांत भोसगे, गणेश दावणे,अंगद मुळे, संजय महापुरे, तातेराव गंदगुळे,शुभम राजे,सुरज चौधरी,शंकर गायकवाड,ओमकार श्रीमंगले,लखन कसबे,विठ्ठल कलमुगले, ज्ञानदेव कलमुगले, नितीन निडवांचे , बालाजी गुराळे, बालाजी बुरले, निळकंठ स्वामी, संतोष बिरादार,राम सगर,हावणा,माणिक बुरले, अनिल मुळे,राम बेडगे, दत्ता राघु,किशोर निडवंचे तसेच शेकडो प्रहार सेवकाच्या प्रमुख उपस्थितीत पुंगी बजाव आंदोलन करण्याता आले..