लातूर विमानतळाच्या विकाससह उदगीर व जळकोट बसस्थानकाच्या कामाला निधी उपलब्ध करुन द्यावा – ना.बनसोडे
उदगीर (एल.पी.उगीले) : महाराष्ट्रातील लातूर जिल्हा हा महाराष्ट्रात शैक्षणिक पॅटर्न म्हणून ओळखले जाते. या भागात मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे असुन शिक्षणाबरोबरच विविध क्षेत्रातील मान्यवर व व्यापा-यांना तातडीने मुंबई , पुणे व अन्य मोठ्या शहरात जाण्यासाठी विमानसेवा उपयोगाची पडते, म्हणून लातूर येथील विमानतळ रिलायंसकडून हस्तांतरीत करुन घेवुन ते विमानतळ विकास प्राधिकरणाला सुपुर्द करावे. जेणेकरुन या विमानतळाच्या कामाला गती देता येईल. अशी मागणी राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे मुंबई येथे आयोजीत बैठकीत केली. लातूर येथील विमानतळापासून ते शहरात ये – जा करण्यासाठीचा मुख्य रस्त्याची दुरावस्था झाली असुन सदर रस्ता हा एम.आय.डी.सी.ने दुरुस्त करावा असेही ना.बनसोडे यांनी सांगितले.
पुढे ना.बनसोडे यांनी मतदार संघातील
उदगीर शहरातील बस स्थानक व जळकोट येथील बस स्थानकाच्या दुरुस्ती व सुशोभीकरणाकरिता निधी देण्यात यावा. तसेच उदगीर रेल्वे स्थानक दुरुस्ती व सुशोभीकरणासाठी निधी देण्याची मागणीही केली आहे.