देशाचा जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकाने मतदान केले पाहिजे – एकनाथ राऊत

0
देशाचा जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकाने मतदान केले पाहिजे - एकनाथ राऊत

उदगीर (एल.पी.उगीले) “लोकशाहीत मताला स्वतःचे महत्त्व आहे. कोणत्याही लोकशाही देशात सरकार बनवण्यात सर्वसामान्य जनतेची म्हणजेच मतदारांची सर्वात मोठी भूमिका असते. मतदान करणे हा प्रत्येक जबाबदार नागरिकाचा हक्क आणि कर्तव्य आहे. आपल्या देशात तरुणांची संख्या जास्त आहे. त्यामुळे देशाचे उज्जल भविष्य घडण्यासाठी तरुणांनी मतदानाबाबत जागरुक असणे गरजेचे आहे.” असे प्रतिपादन सहशिक्षक एकनाथ राऊत यांनी केले.
उदगीर येथील लालबहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून सहशिक्षक एकनाथ राऊत यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. लोकशाहीला सक्षम करण्यासाठी व देशाचे भवितव्य उत्तम घडविण्यासाठी योग्य नेतृत्वाची देशाला गरज असते, असे नेतृत्व निवडून देण्याचे दायित्व मतदारावर असते. म्हणूनच आपण मतदान प्रक्रियेत सहभागी झाले पाहिजे, व लोकशाहीच्या महोत्सवात योगदान दिले पाहिजे. असे आवाहन यावेळी राऊत यांनी केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे पर्यवेक्षक कृष्णा मारावार तर प्रमुख उपस्थिती इतिहासाचे अभ्यासक सचिन यतोंडे व आशाताई कल्पे उपस्थित होते. अध्यक्षीय समारोपात कृष्णा मारावार यांनी या दिवसाचे महत्त्व सांगताना म्हणाले,’ भारतातील प्रत्येक मतदाराचे मत देशाच्या भविष्याचा पाया घालते. म्हणून प्रत्येक व्यक्तीचे मत राष्ट्रनिर्मितीत अमूल्य आहे. जगातील भारतासारख्या सर्वात मोठ्या लोकशाही मध्ये मतदानासंदर्भात घसरणारा कल पाहता मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला.’
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अंबिका पारसेवार यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व शिक्षक बांधवांनी सहकार्य केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *