किरकोळ कारणावरून चाकूने मारहाण गुन्हा दाखल

0
किरकोळ कारणावरून चाकूने मारहाण गुन्हा दाखल

किरकोळ कारणावरून चाकूने मारहाण गुन्हा दाखल

उदगीर (एल. पी. उगिले) : उदगीर शहरातील विकास नगर भागात राहणारे पंढरीनाथ तुळशीराम सुकनीकर यांच्या घरी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास आरोपी दत्ता पाटील, त्याचा एक मुलगा आणि एक अनोळखी व्यक्ती जाऊन, “तू आम्हाला शिवी का दिली?” अशी विचारणा करत फिर्यादी क्रमांक एक याने सुकनिकर पंढरीनाथ यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करून चाकूने उजव्या कानावर व उजव्या पायावर मारून जखमी केले. व शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली, तर आरोपी क्रमांक दोन आणि तीन यांनी फिर्यादीच्या आई वडील व पत्नी यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. अशी तक्रार पंढरीनाथ तुळशीराम सुकणीकर यांनी उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे दिल्यावरून आरोपी दत्ता पाटील व दोन इतर यांच्याविरुद्ध गु.र.क्रमांक 81 /24 कलम 452, 324, 323, 504, 506, 34 भारतीय दंड विधान संहिता अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कांबळे हे करत आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *