टेंभुर्णीकरांचे पिण्याच्या पाण्यासाठी आंदोलन
अहमदपूर (गोविंद काळे) : ग्रामपंचायत टेंभुर्णी येथील शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यालय प्रमुख सुभाष गुंडीले, व समस्त गावकरी मंडळी ग्रामपंचायत टेंभुर्णी येथे पिण्याच्या पाण्यासंदर्भात धरणे आंदोलन पंचायत समिती कार्यालय अहमदपूर येथे उपोषण चालू असताना, तहसीलदार पालेपाड साहेब,. गट विकास अधिकारी अंदलवाड व शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांनी मध्यस्थी करून तहसीलदार , गट विकास अधिकारी यांनी ग्रामपंचायत टेंभुर्णी साठी मुख्याधिकारी यांना लेखी स्वरूपात पत्र काढून अहमदपूर येथील सार्वजनिक पाण्याचे टाकी येथून ग्रामपंचायत टेंभुर्णी यांना 36000 लिटर पाणी चार दिवसांमध्ये सप्लाय करण्याचे लेखी पत्र दिले . त्यामुळे पंचायत समिती कार्यालय अहमदपूर येथे बसलेले धरणे आंदोलन व उपोषण चार दिवसांमध्ये टँकरची सोय होणार आहे म्हणून सोडण्यात आले आहे. चार दिवसात तर टँकरची सोय नाही झाली तर लोकशाही मार्गाने रस्ता रोको करून आंदोलन करण्यात येणार आहे. त्यावेळी उपस्थित अंगद सोळंके, रंगनाथ सोळंके, काशिनाथ सोळंके, माधव शिंदे, दत्तात्रेय सोळंके, मेहबूब पठाण,लक्ष्मण जाधव, बालाजी कासले, केशव सोळंके, बजरंग गायकवाड, मारुती बिलापट्टे, इस्माईल पठाण, महादेव चलवदे , उप तालुकाप्रमुख तिरुपती पाटील, शिवसेना उप शहर प्रमुख शिवकुमार बेंद्रे, अजय सुरनर, ओम गुंडरे, राहुल गिरी, बाळू चव्हाण, समस्त गावकरी उपस्थित होते.