अहमदपूर शहर कडकडीत बंद; सगे-सोयरे कायद्यात रूपांतर करा

0
अहमदपूर शहर कडकडीत बंद; सगे-सोयरे कायद्यात रूपांतर करा

अहमदपूर शहर कडकडीत बंद; सगे-सोयरे कायद्यात रूपांतर करा

सकल मराठा समाजाकडून जरांगे पाटलांच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा.

अहमदपूर (गोविंद काळे) : मराठा समाजाचा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे दिनांक १० फेब्रुवारी पासून सगे -सोयरे याचे शासनाने त्वरित कायद्यात रूपांतर करावे. या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी या शहरातील मुख्य बाजारपेठ ,शाळा सर्व व्यवहार कडकडीत बंद ठेवण्यात आले होते. सकल मराठा समाजाच्या वतीने यावेळी शहरातून भव्य रॅलीही काढण्यात आली.
येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सकाळी ९:३० वाजण्याच्या सुमारास सकल मराठा समाजाचे बांधव मोठ्या संख्येने जमले होते. या ठिकाणी अहिल शेख या छोट्या मुलांनी जिजाऊ वंदना घेतली. यानंतर सर्व मराठा समाजाचे बांधव यांनी शहरातील मुख्य रस्त्यांवरून भव्य अशी रॅली काढली. यावेळी अनेक व्यापारी या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. शहरातील सर्व व्यापारी बांधवांनी आपले व्यवहार स्वतःहून बंद ठेवले होते. या शहरातील उर्दू, मराठी, इंग्रजी या सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. अत्यावश्यक सेवा वगळता शहरात सर्व कडकडीत बंद असल्याचे पहावयास मिळाले. शेवटी सकल मराठा समाजाची रॅली ही छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आल्यानंतर तेथे अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले.
शासनाने मराठा समाजाच्या भावनांचा अंत न पाहता मनोज जरांगे पाटील यांनी शासनासोबत आरक्षण मिळण्याच्या संदर्भात जी काही चर्चा केली आहे. त्यासंदर्भात त्वरित कायद्यात रूपांतर करून मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी दिलेला शब्द पाळावेत. सध्या जरांगे पाटील यांची प्रकृती खूप बिघडलेली आहे. याचा विचार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी एक दिवसाचे अधिवेशन घेऊन अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करण्याची मागणी यावेळी अनेकांच्या मनोगतातून करण्यात आली. याप्रसंगी बालाजी कदम, बालाजी शिंदे ,माणिक कदम, बागन शेख ,शिवकुमार कदम, गजानन गुरनाळे ,सुदर्शन पाटील ,विठ्ठल श्रीमंगले आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.
शहरातील व्यापारी संस्थाने ,शाळा सर्व काही व्यवहार आपोआप बंद ठेवून बंदमध्ये सहभाग नोंदविला. या रॅलीच्या वेळी सकल मराठा समाजाचे देवानंद मुळे , ज्ञानोबा भोसले ,परमेश्वर सूर्यवंशी, प्रा.दत्ता गलाले , प्रा. रोहिदास कदम, मुकेश पाटील,डी. के. जाधव , शिवाजीराव पाटील अंधोरीकर ,बागल शेख, विठ्ठल श्रीमंगले ,सुदर्शन पाटील ,विक्रम भोसले, सचिन जगताप, ॲड.किरण जाधव , सिध्दार्थ जाधव ,शैलेश जाधव ,तानाजी मोरे, नितीन शिंदे, सतीश नवटके, गणेश कोदळे, दयानंद पाटील सह सकल मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!