इनरव्हिल क्लबच्या वतीने जागतिक योग दिनानिमित्त योगदिन साजरा
अहमदपूर (गोविंद काळे) : जागतिक योग दिनानिमित्त इनरव्हिल क्लब अहमदपूर कडून योग दिन साजरा करण्यात आला यावेळी क्लबच्या नूतन अध्यक्ष.सौ.डॉ. वर्षा भोसले क्लबच्या ISO सौ.वैशालीताई चामे माजी अध्यक्षा कलावती भातांब्रे सौ.डॉ. मनकर्णा चिवडे पाटील वसई क्लबच्या उपअध्यक्ष रतनमाला कोठगिरे योग शिक्षिका ठाकूर मँडम, खेडकर शुभांगी तसेच शहरातील अनेक महिलांनी यात सहभाग नोंदविला यावेळी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली नंतर ध्यान प्राणायाम सक्षम व्यायाम सुर्यनमस्कार घेण्यात आला व शांती पाठाने सागंता झाली त्यानंतर महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी कसी घ्यावी या विषयी मार्गदर्शन करण्यात आले. याबरोबर अर्ट आँफ लिव्हिंगच्या शुभांगी खेडकर आणि त्यांचा ग्रुपनी झुंबा वर्क आऊट चे सुंदर सादरीकरण केले अश्या प्रकारे मोठ्या उत्साहात चामे गार्डन येथे योग दिन साजरा करण्यात आला.