स्पंदन गु्रपचा ऑक्सिजन प्लँट देऊन इन्फिनिटी फाउंडेशनने केला गौरव
लातूर (प्रतिनिधी) : कोरोना आजारातून प्राण वाचावा यासाठी स्पंदन ऑक्सिजन समूह डॉ.विश्वास कुलकर्णी यांच्या नेतृत्वात लातूरमध्ये लोकसहभागातून स्पंदन ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभा करत आहे. संवेदनशील मनाचे स्पंदन सदस्य दुसर्यांना ऑक्सिजन मिळावा म्हणून दिवसरात्र एक करत आहेत,अशा स्ंपदनच्या सदस्यांना नैसर्गिक ऑक्सिजन मिळावा यासाठी सामाजिक बांधिलकी जपत इन्फिनिटी फाउंडेशनच्या वतीने निता कानडे व गिरीष कानडे यांनी स्पंदन सदस्यांचा ऑक्सिजन प्लँट भेट देऊन ते करत असलेल्या कार्याचा गौरव केला.
यावेळी त्यांनी स्पंदन ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पास दि इन्फिनिटी फाउंंडेशनने १० हजार रुपयांची देणगी डॉ. आदित्य कानडे व सदस्य इशा कानडे, डॉ.अमृता शिंदे, ओम लवटे, शिवाजी जडे यांच्यावतीने देण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन ममता हॉस्पिटलच्या स्पंदन सभागृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमात इन्फिनिटी फाउंडेशनने स्पंदनचे डॉ. विश्वास कुलकर्णी, डॉ.अनुजा कुलकर्णी, डॉ.अशोक आरदवाड, डॉ.वैशाली टेकाळे, डॉ.अजय जाधव, संजय अयाचित, शिरीष कुलकर्णी, श्रीकांत हिरेमठ आदि उपस्थित होते.