बौध्दनगर स्मशानभूमी वेटींगशेडचे उद्घाटन संपन्न..!

बौध्दनगर स्मशानभूमी वेटींगशेडचे उद्घाटन संपन्न..!

अहमदपूर (गोविंद काळे) : शहरातील बौध्द नगर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत मंजूर झालेल्या स्मशानभूमी वेटींग शेडचे चे उद्घाटन नगराध्यक्षा सौ.अश्वीनीताई कासनाळे यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवक नेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी हे होते.तर प्रमुख पाहूणे म्हणून लक्ष्मीकांत कासनाळे,नगरसेवक गटनेते डाॅ.फूजैल जागीरदार, नगरसेविका सौ.अनूराधा नळेगांकर,कार्यकारी सभापती प्रशांत जाभाडे,शिवाजीराव भालेराव,माधव तिगोटे,आनंदराव सोनकांबळे,बापू वाघमारे,सौ.राणी गायकवाड,अनिता कांबळे,नंदा सोनकांबळे,रेश्मा बनसोडे,इंदुमती वाघमारे,
साबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
दलीत वस्ती सुधार योजनेंतर्गत हे काम मंजूर असून कांही तांत्रिक कारणामुळे हे काम प्रलंबीत होते.नूकतेच हे काम पूर्ण करण्यात आले.

या वेळी अध्यक्षीय समारोप करताना युवकनेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी म्हणाले की,स्मशानभूमीत वेटींग शेडची मोठी गरज होती ही गरज नगरसेविका तनूजाताई सूर्यवंशी व डाॅ.फूजैल जागीरदार यांच्या प्रयत्नाने किम पूर्णत्वास गेले आहे.स्मशानभूमीतील उर्वरीत कामे सूध्दा लवकरच पूर्ण होतील.नगर पालिकेच्या वतीने प्रभागामधील बहुतांश काम पूर्णत्वास गेले असून पुढील कांही दिवसात प्रलंबीत कामे पूर्ण करण्यासाठी कटीबध्द आहोत असे अश्वासन प्रतिपादन केले. सूत्रसंचालन पत्रकार अजय भालेराव यांनी केले तर आभार बालाजी वाघमारे यांनी मानले.

About The Author

error: Content is protected !!