राजकुमार सोमवंशी यांना “राष्ट्रीय सुवर्ण समाजसेवक” पुरस्कार जाहीर
शिरूर ताजबद (गोविंद काळे) : उमरगा यल्लादेवी. ता. अहमदपुर चेअरमन राजकुमार सोमवंशी यांना राष्ट्रीय सुवर्ण समाजसेवक पुरस्कार जाहीर आरंभ प्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य कडून कोवीड काळात केलेली मदत,गोरगरिब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाविषयी ,शेतकर्यांना पिक विमा मिळवून देण्यात मदत करणे,शेतकर्यांची कर्जमाफी व्हावी म्हणुन शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांच्या सोबत केलेले रस्ता रोको आंदोलन आदी कार्यांचा विचार करून आरंभ प्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य यांच्याकडून सोमवंशीला”राष्ट्रीय सुवर्ण समाजसेवक ” पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. आरंभ प्रतिष्ठाण कडून यावर्षी प्रथम महाराष्ट्रातील दहा व्यक्तींना राष्ट्रीय सुवर्ण समाजसेवक पुरस्कार दिला जाणार असून त्यात राजकुमार सोमवंशीची या पुरस्काराकरिता निवड झाली आहे. हा पुरस्कार ता. पाच जुलै उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे देण्यात येणार आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल बाबुराव श्रीमंगले, बालाजी पडोळे, प्रा.राहूल तिगोटे, धर्मपाल सरवदे, गजानन श्रीमंगले आदींनी अभिनंदन केले.