आ. बाबासाहेब पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत बीजप्रक्रिया व बी बीएफ पेरणी प्रात्यक्षिक
अहमदपूर (गोविंद काळ) : तालुक्यातील शिरूर ताजबंद येथे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बीजप्रक्रिया व बी बीएफ पेरणी प्रात्यक्षिक तसेच टोकन यंत्राने सोयाबीन पेरणीचे प्रात्यक्षिक करण्यात आले.
या विषयीची अधिक माहीती अशी की, महाराष्ट्र शासन कृषी विभाग आयोजित कृषी संजीवनी सप्ताह निमित्ताने शेतात बीजप्रक्रिया व बी बीएफ पेरणी प्रात्यक्षिक तसेच टोकन यंत्राने सोयाबीन पेरणीचे प्रात्यक्षिक जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने व तालुका कृषी अधिकारी भुजंग पवार यांनी प्रात्यक्षिकाचे सादरीकरण केले. याप्रसंगी आमदार पाटील यानी बिबीएफ तंत्रज्ञानाबाबत समाधान व्यक्त करुन शेतकऱ्यांना बीजप्रक्रिया करून बी बी एफ वर पेरणी करावी असे आवाहन केले.
याप्रसंगी जिल्हा कृषी विकास अधिकारी सुभाष चोले, उपविभागीय कृषी अधिकारी महेश तीर्थकर, तालुका कृषी अधिकारी पवार साहेब, तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, जी प सदस्य माधवराव जाधव, युवक जिल्हा कार्यध्यक्ष प्रशांत भोसले, युवक तालुकाध्यक्ष दयानंद पाटील, शेतकरी रणधीर पाटील, उपसरपंच प्रताप पाटील, बालाजी गुंडरे, कृषी सेवक सूर्यवंशी, घुमे, कृषी विभागाचे इतर अधिकारी, कर्मचारी यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते.