ओबीसी आरक्षणा साठी 26 जून च्या चक्का जाम आंदोलनात सरकारचे डोके ठिकाणावर आणण्यासाठी हजारोंच्या संख्येने सामील व्हा – माजी आ.गोविंद केंद्रे

ओबीसी आरक्षणा साठी 26 जून च्या चक्का जाम आंदोलनात सरकारचे डोके ठिकाणावर आणण्यासाठी हजारोंच्या संख्येने सामील व्हा - माजी आ.गोविंद केंद्रे

उदगीर (एल.पी.उगिले) : ओबीसी आरक्षण प्रश्नी भारतीय जनता पक्षातर्फे 26 जून ला चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. या आघाडी सरकारचे डोके ठिकाणावर आणायचे असेल तर या चक्काजाम आंदोलनात हजारोंच्या संख्येने सामील व्हा. असे आवाहन माजी आ. गोविंद आण्णा केंद्रे यांनी केले आहे. या आंदोलनाची नियोजन बैठक प्रसंगी ते बोलत होते. 26 जून च्या ओबीसी आरक्षण बचाव साठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षातर्फे चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. त्याच्यासाठी नियोजन बैठकीचे आयोजन उदगीर येथे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष  यांच्या निवासस्थानी करण्यात आले होते. या नियोजन बैठकीला माजी आमदार गोविंद आण्णा केंद्रे, ज्येष्ठ नेते भगवान दादा पाटील तळेगावकर, भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव धर्मपाल नादरगे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे, उदगीरचे नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, अविनाश रायचूरकर, भाजपाचे उदगीर तालुका अध्यक्ष बस्वराज  रोडगे, जळकोट तालुकाध्यक्ष अरविंद पाटील  नागरगोजे, उदगीर भाजपचे शहराध्यक्ष उदयसिंग ठाकूर,भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल निडवदे, भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रा. पंडित सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष बालाजी गवारे, भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष नामदेव आपटे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सोमेश्वर सोप्पा, जिल्हा परिषद सदस्य बस्वराज बिरादार, जिल्हा परिषद सदस्य शंकर रोडगे, साईनाथ आप्पा चिमेगावे, उत्तराताई कलबुर्गे, शामलाताई कारामुंगे, आदींसह जिल्हा परिषद सदस्य, पं. स. सदस्य, नगरसेवक व प्रमुख  पक्ष पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये ही  नियोजनाची बैठक घेण्यात आली. उदगीर भारतीय जनता पक्षातर्फे ऐतिहासिक चक्काजाम आंदोलन करण्याचे सर्वानुमते या बैठकीमध्ये ठरले.

About The Author