राज्य सरकारच्या निष्क्रियपणामुळेच ओबीसी चे आरक्षण रद्द – माजी आ. गोविंद आण्णा केंद्रे
ओबीसी आरक्षणासाठी उदगीर मधील आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद
उदगीर (एल.पी.उगीले) : भारतीय जनता पक्षातर्फे संपूर्ण महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणासाठी दि. 26 जून रोजी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. उदगीर मधील चक्काजाम आंदोलनाला अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भारतीय जनता पक्षातर्फे सर्व नेते, पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी सकाळी सव्वा दहा वाजल्यापासून अडीच वाजेपर्यंत शिवाजी चौकामध्ये चक्काजाम आंदोलन केले. भाजप सरकारने दिलेले मराठा आरक्षण या सरकारला सुप्रीम कोर्टामध्ये टिकवता आले नाही. ओबीसी चे राजकीय आरक्षण टिकवण्यासाठी चौदा महिन्यांपासून सुप्रीम कोर्टामध्ये वेळकाढूपणा या महाआघाडी सरकारने केला आणि त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाने राजकीय क्षेत्रातील ओबीसी आरक्षण रद्द केले. महा आघाडी सरकारचा नाकर्तेपणा संपूर्णपणे या गोष्टीला जबाबदार असून राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलावून ओबीसी आरक्षणासाठी अध्यादेश काढावा व इम्परिकल डाटा सुप्रीम कोर्टामध्ये सादर करून ओबीसींना दिलेले राजकीय आरक्षण टिकवावे. असे आवाहन माजी आमदार गोविंद आण्णा केंद्रे यांनी चक्काजाम आंदोलनवेळी मार्गदर्शन करताना केले.
भाजपाच्या काळात विविध विकास कामे झालेली आहेत, त्याचे आजच्या आमदारांनी श्रेय घेऊ नये. उदगीर मधील उड्डाणपूल, जळकोट बिदर हायवे, उदगीर नगर परिषदेमध्ये नगरोत्थान योजनेअंतर्गत 78 कोटींचा निधी आणला. लिंबूटीचे पाणी उदगीरला येणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने ही सर्व कामे झालेली असून राज्यमंत्र्यांनी याचे श्रेय घेऊ नये. राज्य सरकारनेच ओबीसी आरक्षण घालवले आहे. ज्येष्ठ नेते भगवान दादा पाटील तळेगावकर यावेळी म्हणाले की, भाजपच्या फडणवीस सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले, ते हायकोर्टामध्ये ही टिकवले. महाआघाडीचे सरकार आले व त्यांना सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षणासाठी बाजू व्यवस्थित न मांडल्यामुळे मराठा आरक्षण रद्द झाले. याला सर्वस्वी हे नाकर्ते राज्यसरकार जबाबदार आहे. तसेच ओबीसीचे आरक्षण ही यांच्या वेळकाढू धोरणामुळे गेले आहे. म्हणून आजचे चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे. लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे मार्गदर्शन करत असताना म्हणाले की, इम्पॅरिकल डाटा न दिल्यामुळे, राज्य सरकारने वेळकाढू धोरण अवलंबिले यामुळेच ओबीसी आरक्षण रद्द झाले असून राज्य शासनाची इच्छाशक्ती ओबीसी आरक्षण देण्याची दिसून येत नाही. भारतीय जनता पक्षातर्फे उदगीर मध्ये केलेल्या चक्काजाम आंदोलनाला महाराष्ट्र भाजपचे नेते माजी आ. गोविंद अण्णा केंद्रे, ज्येष्ठ नेते भगवान दादा पाटील तळेगावकर, लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, उदगीर नगर परिषदेचे अध्यक्ष बस्वराज बागबंदे, उपनगराध्यक्ष सुधीरभाऊ भोसले,जिल्हा परिषद सदस्य बस्वराज पाटील कौळखेडकर, ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव धर्मपाल नादरगे,जेष्ठ नेते जळकोट सोमेश्वर सोप्पा,भाजपा नेत्या उत्तराताई कलबुर्गे, शामलाताई कारामुंगे, मधुमती कनशेट्टे, उदगीर तालुकाध्यक्ष बस्वराज रोडगे, जळकोट तालुकाध्यक्ष अरविंद पाटील नागरगोजे, भाजपा उदगीर शहराध्यक्ष उदयसिंह ठाकूर, भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अमोल निडवदे, जिल्हा परिषद सदस्य शंकर रोडगे,माजी सभापती विजयकुमार पाटील, अनुसूचित जाती मोर्चाचे प्रा. पंडित सूर्यवंशी, बालाजी गवारे, आदींसह हजारोंच्या संख्येने पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.