अहमदपूर शहरात ओबीसी आरक्षणासाठी भाजपाच्या वतीने चक्काजाम आंदोलन
अहमदपूर (गोविंद काळे) : महाराष्ट्रातील ओबीसी चे आरक्षण राज्यातील बेजबाबदार सरकारच्या निष्क्रियपणामुळे सुप्रीम कोर्टात रद्द झाले. हे आरक्षण जो पर्यंत मिळवून देणार नाही तो पर्यंत भारतीय जनता पार्टीचा लढा थांबणार नाही असे मत भाजपचे प्रदेश प्रवक्ते मा. गणेश दादा हाके यांनी भाजपच्या वतीने अहमदपूर च्या चक्का जाम आंदोलना वेळी करण्यात आले.
प्रदेश प्रवक्ते मा. गणेशदादा हाके, मा.आ. बब्रुवानजी खंदाडे, मा. सभापती दिलीपरावजी देशमुख, जि. प. सदस्य मा. अशोक काका केंद्रे, जि. महिला मोर्चा अध्यक्षा मा. रेखाताई तरडे मॅडम, जिल्हा सरचिटणीस मा. त्र्यंबक आबा गुट्टे, यांच्या नेतृत्वामध्ये शहरात आंदोलन करण्यात आले. यावेळी तालुका अध्यक्ष मा. प्रा. हणमंतराव देवकत्ते सर, पं. स. सभापती मा. श्रीमती गंगासागर ताई जाभाडे, उपसभापती मा. बालाजी गुट्टे, सदस्य मा. राम नरवटे, कुलदीप हाके, बाळासाहेब होळकर, भाजपा ता. उपाध्यक्ष संतोष कोटलवार, परमेश्वर पाटील, ता. सरचिटणीस प्रताप पाटील, दत्तात्रय जमालपुरे, बालाजी पडोळे, माधव मुंढे, रमेश कांबळे, गायबाई शिरसाठ, गोविंद कांडनगिरे, विजय माने, अर्जुन गंगथडे, डॉ. सिधार्थकुमार सूर्यवंशी, श्याम यादव, ब्राह्मनंद सोनेवाड, साईनाथ गादेवार, रतन सौदागर, गोविंद बैकरे, बाबासाहेब कांबळे, नरसिंग कोंडलवाडे, शेकापुरे कमलाकर, चंदू पाटील, राम देवकत्ते, संग्राम मुंढे, गोरे दत्ता, जयश्री केंद्रे, कमलाकर पाटील, नाथराव केंद्रे, शरद जोशी, टोम्पे मॅडम, अनंत गुट्टे, अमोल तरडे, वकील व्यंकट मुंढे, व इतर सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच जनता यावेळी उपस्थित होती.