बालाघाट तंत्रनिकेतन मध्ये राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी
अहमदपूर (गोविंद काळे) : बालाघाट तंत्रनिकेतन, रुद्धा ता.अहमदपूर च्या वतीने राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त संस्थेच्या संचालिका सौ शिवालीकाताई हाके यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी बोलताना शिवालीकाताई म्हणाल्या ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी या काळामध्ये शाहू राजांनी प्रयत्न केले, महाराजांना “राजर्षी” ही पदवी कानपूरच्या कुर्मी समाजाने दिली. महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास “शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र” असे म्हणतात. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. महाराजांनी सुमारे २८ वर्षे राज्यकारभार केला. तसेच ५०० ते १००० लोकवस्तीच्या गावांमध्ये शाळा काढल्या. त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. सामाजिक बंधुभाव, समता, दलित व उपेक्षित बांधवांचा उध्दार, शिक्षण, शेती, उद्योगधंदे, कला, क्रिडा व आरोग्य इत्यादी महत्वपूर्ण क्षेत्रामध्ये अद्वितीय स्वरूपाचे कार्य केले. असे गौरवउदगार काढले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नितीन शिवपुजे, उपप्राचार्य स्वप्निल नागरगोजे, प्रा मदन आरदवाड, प्रा.दहिटकर सुहास, प्रा कालिदास पिटाळे, प्रा संतोष लातुरे, प्रा. गणेश यमगिर प्रा.स्वामी महेश, प्रा.संग्राम कोपणर, प्रा.सचिन आडे, प्रा.श्रुती मेणकुदले, प्रा.आरती पुणे, प्रा रूपा पाटील, प्रा. भिसे, श्री सिद्राम मासोळे, श्री कुलकर्णी विजय, श्री केंद्रे सतीश, श्री कैलास होनमाणे, श्रीमती विद्या शिंदे आदी कर्मचारी उपस्थित होते.
