छत्रपती शाहूमहाराज जयंती निमित्त मित्रमंडळाचा उपक्रम

छत्रपती शाहूमहाराज जयंती निमित्त मित्रमंडळाचा उपक्रम

अहमदपूर (गोविंद काळे) : छत्रपती राजर्षी शाहूमहाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने संयोजन समितीच्या वतीने ग्रामीण रूग्णालयातील डाॅक्टर व आरोग्य कर्मचारी यांना कोरोना योद्धा म्हणून प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देवून डाॅक्टर तथा आरोग्य कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवकनेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी हे होते.तर प्रमुख पाहूणे म्हणून कार्यकारी सभापती प्रशांत जाभाडे,अँड.राजपाल गायकवाड,पत्रकार लखन गायकवाड यांची उपस्थिती होती. तर सत्कारमूर्ती म्हणून ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ.बी.एच.बिराजदार साहेब, डाॅ.सूरजमल सिंहाते,डाॅ.रमेश केंद्रे, डाॅ.प्रविण भोसले, डाॅ.अमृत चिवडे, डाॅ.धिरज देशमुख, डाॅ.अंकीता कुलकर्णी,डाॅ.अनुराग कासनाळे तसेच आरोग्य कर्मचारी प्रविणा पाटील,सतिश पाटील,सुनिता पारधी आदी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी अध्यक्षीय भाषण करत असताना डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी म्हणाले की, कोरोना महामारी मध्ये आपल्या जीवाची पर्वा नकरता आरोग्यविभाग, पोलीस विभाग आणी स्वच्छता कर्मचारी तसेच पत्रकार यांनी कठोर परिश्रम घेवून सबंध मानवजातीच्या हितासाठी झटले आहेत.या सेवा कार्याला कूठलेच मोल नाही.जनतेने सूध्दा यंत्रणेने केलेल्या कार्याबद्दल कायम कृतज्ञता व्यक्त करणे गरजेचे आहे.

  या कार्यक्रमाचे प्रस्ताविक जयंती मंडळाचे अध्यक्ष अँड राजपाल गायकवाड यांनी केले तर आभार वैद्यकीय अधीक्षक डाॅ.बी.एच.बिराजदार यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठीजयंती मंडळाचे अध्यक्ष अँड.राजपाल गायकवाड,उपाध्यक्ष प्रदीप सोनकांबळे, सचिव कपील कांबळे, सहसचिव अजय वाघमारे, अमित गायकवाड,शरद सूर्यवंशी, अनिल तिगोटे, विनोद गायकवाड, राष्ट्रपाल गायकवाड, अँड. संतोष कांबळे, धनंजय कांबळे, अभिलाष ससाणे, अंकुर शिंदे, गोविंद सरकाळे, हर्षवर्धन हावरगेकर आदींनी  पुढाकार घेतला.

About The Author