प्रभुराज प्रतिष्ठान व मनसे विधी सेवा लातूरच्या वतीने प्रतिकात्मक गुटख्याची होळी करत व्यसन मुक्तीचा संदेश
लातूर (प्रतिनिधी) : संभाजी नगर, खाडगाव रोड, लातूर परिसरात प्रभुराज प्रतिष्ठान व मनसे विधी सेवा वतीने होळी सणाची औचित्य साधून गुटख्याची होळी करून व्यसन मुक्ती चा संदेश देण्यात आला.
सद्या गुटख्यावर शासनाने बंदी घातली असून ही बाजारात गुटख्याची विक्री मोठ्या प्रमाणात दिसून येते त्यात अनेक तरुण मित्र व्यसनांधीन होत चालले आहे. या यावर शासन लाखो रुपय खर्च करून व्यसन मुक्ती चा संदेश देत आहे.गुटखा व्यसन करताना अनेक लोक दिसत असल्याने त्यांना जागृत करण्याची गरज आहे. गुटखायापासुन अनेक रोग होतात त्यापासुन दुर होण्यासाठी लिकानी व्यसनापासुन दूर रहावे. त्याने आपले शरीर निरोगी राहून आपल्या परिवाराचे संरक्षण होईल. जीवन हे मोलाचे आहे त्याचा संभाळ व जतन करणे आपले कर्तव्य असल्याने सर्वांनी व्यसन मुक्ती चा संदेश लोकांपर्यंत पोहचवावा.व्यसन मुक्तीचे बोलके फलक हातात घेऊन व्यसन मुक्तीचा संदेश देऊन जनतेत जनजागृती करण्यात आली.
गुटखा टाळा… आरोग्य जपा…
गुटखा खाणे टाळा…
कर्करोगापासुन दूर राहा…
यावेळी प्रभुराज प्रतिष्ठान व मनसे विधी सेवा अध्यक्ष अँड.अजय कलशेट्टी,अँड. शुभम येलशेट्टे, जेष्ठ समाजसेवक संजय जमदाडे, अशोक पंचाक्षरी, शिरीष माळी,जेष्ठ नागरिक लक्षिमन लोहारे, ग्यानोबा मोरे, सौरभ पाटील, गोपाळ खंडागळे,गोपाळ कातलाकुट्टे, मुन्ना धुळे व इतर उपस्थित होते.