महात्मा फुले महाविद्यालयात शहीद दिनानिमित्त शहिदांना अभिवादन
अहमदपूर (गोविंद काळे) : भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात इंग्रज सरकारच्या विरोधात क्रांतिकारक उठाव करत आत्मबलिदान देऊन अजरामर ठरलेले हुतात्मा वीर भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या शहिदांना शहिददिनानिमित्त येथील महात्मा फुले महाविद्यालयात विनम्र अभिवादन करण्यात आले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लेखक, समीक्षक तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते तर समाजशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. सतीश ससाणे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शहिदांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. पांडुरंग चिलगर यांनी केले तर आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. बब्रुवान मोरे यांनी केले. यावेळी डॉ. अभिजीत मोरे, डॉ. नागराज मुळे, डॉ. दिगंबर माने, डॉ. मारोती कसाब, डॉ. प्रकाश चौकटे, डॉ. प्रशांत बिरादार, डॉ. संतोष पाटील, ग्रंथपाल प्रा. परमेश्वर इंगळे, कार्यालयीन प्रमुख प्रशांत डोंगळीकर, शिवाजी चोपडे, चंद्रकांत शिंपी यांच्यासह सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.