उत्तम आरोग्यासाठी पाण्याची वर्षातून दोनवेळा चाचणी आवश्यक – श्रीमती एस के चव्हाण
अहमदपूर (गोविंद काळे) : पाण्यापासून विविध प्रकारचे आजार होतात, त्यामुळे आपले आरोग्य उत्तम राखण्यासाठी वेळोवेळी शासनमान्य अधिकृत प्रयोग शाळेतून पाण्याची चाचणी वर्षातून दोनदा आवश्यक असून ती करावी असे अवाहन भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा पंचायत समिती अहमदपूर च्या अनुजैविक तज्ज्ञ श्रीमती एस. के. चव्हाण यांनी केले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या ग्रीन क्लब व भूगोल विभागाच्या वतीने ‘जागतिक जल दिना’चे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील होते तर विचार मंचावर उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी, कार्यक्रमाचे संयोजक डॉ. डी. एन. माने आदींची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलतांना श्रीमती एस. के. चव्हाण म्हणाल्या की, अशुद्ध पाण्यामुळे कावीळ, मलेरिया यासह हाडे ठिसूळ होणे तसेच दातांचे विविध प्रकारचे आजार होतात. हे आजार टाळण्यासाठी शुद्ध पाणी पिणे आवश्यक आहे, असे म्हणून त्यांनी आकरा पॅरॅमिटर्स द्वारे नमूद केल्या.
यावेळी त्यांनी प्रात्यक्षिकासह शुद्ध पाणी व पाण्यातील घटक यावर सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपाप्रसंगी प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाचे संयोजक डॉ. डी. एन. माने यांनी केले व सूत्रसंचालन प्रो. डॉ.अनिल मुंढे यांनी तर आभार डॉ. सचिन गर्जे यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .