एस.टी.महामंडळाच्या गलथान कारभारामुळे प्रवाश्यांच्या जिवीतास धोका

0
एस.टी.महामंडळाच्या गलथान कारभारामुळे प्रवाश्यांच्या जिवीतास धोका

एस.टी.महामंडळाच्या गलथान कारभारामुळे प्रवाश्यांच्या जिवीतास धोका

हाळी हंडरगुळी : एस.टी.महामंळाच्या अहमदपूर डेपोच्या बसचे चालु प्रवासात ड्रायव्हर साईड दरवाजा तुटून पडल्यामुळे गाडी चालकांचा ताबा सुटता सुटता सावरला व अनेक प्रवाशांच्या जिवीतास होणारा धोका टळला. होळीच्या दिवशी दुपारी अहमदपूर आगाराची अहमदपूर- उदगीर जाणारी बस हाळी गावावरून पुढे उदगीर कडे जात असताना बालाजी लंच होम समोर चालु बसचा दरवाजा तुटून पडला.बाजुने जात असलेला दुचाकी चालक बालंबाल बचावला.बस चालकांने अचानक दरवाजा खाली पडल्याने घाबरून काय झाले हे पाहायचा प्रयत्न केला, त्यामुळे बस वरील नियंत्रण सुटता सुटता सावरले . एस.टी.प्रवास सुखाचा प्रवास असे संबोधले जाते पण आज प्रत्यक्षात मात्र तशी परिस्थिती राहिलेली नाही.ब-याच वेळी प्रवाश्यांना त्रास सहन करावा लागत आहे. कालबाह्य झालेल्या बस गाड्या रस्त्यावर धावत आहेत, परिणामतः कधी कधी रस्त्यामध्ये टायर पंचर होने किंवा फुटल्याने गाडीत पर्यायी टायरची व्यवस्था नसल्यामुळे बस तिथेच थांबून ठेवावी लागते. इतरही अनेक गोष्टी ज्या प्रवाशांच्या हितासाठी आवश्यक असतात, जसे की प्राथमिक उपचाराची पेटी, स्टेपनी,इतर आवश्यक गोष्टी पण बस मध्ये उपलब्ध नसतात.त्यावेळी चालक व वाहक यांना दूरध्वनीवर संपर्क करून डेपोमध्ये या घटनेची माहिती देऊन नवीन बस गाडी मागून घ्यावी लागते, दुसरी गाडी येईपर्यंत वाट बघत बसायची वेळ येते.अश्या ब-याच बसेस जुन्या आहेत, त्यांना रोड वर चालवण्यासाठी परवानगी आहे आहे की नाही? हेही कळायला मार्ग नाही. जनतेच्या जीविताचा विचार करून आरटीओ कार्यालयाने आशा जुनाट झालेल्या बस गाड्यांची तपासणी करून त्या संदर्भातला स्पष्ट अहवाल एसटी महामंडळाला द्यावा अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे. सद्यस्थितीत बस प्रवास सुरक्षीत कसा ? अशा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. आमच्या प्रतिनिधीने संबधीत विभाग नियंत्रक लातूर जानराव यांच्याशी संपर्क साधला असता, पुढील तपास करुन संबंधीत दोषीवर कार्यवाही करण्याचे दूरध्वनी वरून आश्वासन दिले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *