वडमुरंबी येथे अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि संत जगद्गुरु तुकाराम महाराज बीज उत्सव
देवणी (लक्ष्मण रणदिवे)
देवणी तालुक्यातील वडमुरंबी येथील हनुमान मंदिर परिसरामध्ये दरवर्षी प्रतीप्रमाणे दिनांक 27 मार्च 2024 वार बुधवार ते 3 एप्रिल 2024 पर्यंत वडमुरंबी येथील वैकुंठवासी वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान तथा आधारस्तंभ हरिभक्त कोमलताई दशरथराव मोरे यांच्या प्रेरणेने अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आलेला आहे.27 मार्च बुधवार रोजी जगद्गुरु संत तुकाराम महाराज बीज उत्सव गुलालाचे कीर्तन पुणे देवाची आळंदी येथील गुरु विनोदाचार्य महाराजांचे शिष्य तथा वडमुरंबी वारकरी मोरे परिवार कुटुंबाचे वारस जोपासणारे ह भ समाज प्रबोधनकार नामवंत सतीशजी ज्ञानोबा मोरे उर्फ माऊली महाराजाची कीर्तनाची सेवा या ठिकाणी आयोजित करण्यात आली.या कार्यक्रमास पुणे देवाची आळंदी येथील प्रसिद्ध गायन कोकिळा शिवनंदाताई पांचाळ आणि पखवाज वादक सुप्रसिद्ध संगीतकार पुरुषोत्तम पांचाळ यांची उपस्थिती होती.
ह भ प सतीश मोरे महाराज संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक राज्य मार्ग समाज प्रबोधनकार नामवंत महाराज म्हणून नावलौकिक कीर्तनाची सेवा करीत असतात.वडमुरंबी ग्रामस्थ नागरिकांनी तरुण युवा पिढीच्या वतीने संत तुकाराम महाराजांच्या बीज गुलालाच्या उत्सव कार्यक्रमांमध्ये वडमुरंबी नगरीचे सरपंच मधुकरराव मोरे आणि तरुण युवा मंडळ महेश बिरादार गुरुजी, व्यंकटेश बिजापुरे, ईश्वर स्वामी, संगमेश्वर बिरादार, भगवान पाटील, बालाजी गव्हाणे, विजयकुमार आवळे, धनराज हरनाळे, अप्पाराव पाटील, गणेश बिरादार, गणेश बिजापूरे, असे अनेक मित्र परिवाराच्यावतीने आनंदाच्या उत्साहात ह भ प सतीश मोरे उर्फ माऊली महाराजांचे शाल, श्रीफळ, पुष्पहार अर्पण करून सेवेसाठी शुभेच्छा दिल्या.