बीकॉम टी वाय च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील बीकॉम तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे प्रा.डॉ.ह.वा.कुलकर्णी तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ.आर.के.मस्के उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.डॉ.बी.एस. होकरणे, प्रा.डॉ.एस.एन.घोंगडे, प्रा.खरात, प्रा.गणेश पळणाटे इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.डॉ.बी.एस. होकरणे यांनी केले. या वेळी बी.कॉम. तृतीय वर्षातील विद्यार्थी मोतीपवळे शुभम, वैजापूरे प्रसाद, टिलानी ईशिका, कोनमारे कोमल, सोनार सपना, पांडुरंग जळकोटे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रमुख पाहुणे कुलकर्णी बोलताना म्हणाले, वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना अनेक संधी उपलब्ध आहेत, त्या संधीचा शोध घेऊन उज्वल भविष्य घडविणे काळाची गरज आहे. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य मस्के म्हणाले, विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनात घेतलेल्या शिकवणीचे अनुकरण भविष्यात करुन एक समाजशील नागरिक म्हणून ओळख निर्माण करणे आवश्यक आहे. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वयंशिस्त पाळणे ही काळाची गरज आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.कॉम.प्रथम वर्षातील कु.शुभांगी फड यांनी केले. तर आभार तृतीय वर्षाचा विद्यार्थी शुभम मोतीपोळे यांनी मानले.