अर्चनाताई पाटील चाकूरकर, राजेश्वर नीटुरे भाजपाच्या वाटेवर !!

0
अर्चनाताई पाटील चाकूरकर, राजेश्वर नीटुरे भाजपाच्या वाटेवर !!
अर्चनाताई पाटील चाकूरकर, राजेश्वर नीटुरे भाजपाच्या वाटेवर !!
अर्चनाताई पाटील चाकूरकर, राजेश्वर नीटुरे भाजपाच्या वाटेवर !!

उदगीर (एल. पी. उगिले) : उदगीर येथील लाईफ केअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल च्या संस्थापिका तथा अध्यक्ष डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर या गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार, अशी चर्चा असायची. मात्र आता या चर्चेला पूर्णविराम देत अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे. सतत काँग्रेसशी एकनिष्ठ राहिलेले माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या त्या सून आहेत. त्यामुळे प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या प्रवेशाच्या संदर्भात निर्णय घेतला, त्यावेळेस चाकूरकरांचे काँग्रेस प्रेम ऊतू जात होते, परिणामतः काही आलेल्या संधी देखील डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांना सोडाव्या लागल्या, मात्र सध्या काँग्रेस मधील अनेक मातब्बर नेते भारतीय जनता पक्षात जात असल्याने, आणि राष्ट्रीय काँग्रेसमध्ये मराठवाड्यात तरी केवळ देशमुखांचे वर्चस्व असून, “हम करे सो कायदा” अशी भूमिका देशमुख परिवार घेत असल्याचा राग मनात धरून अनेक काँग्रेस कार्यकर्ते देखील भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर आहेत.
नुकतेच बसवराज पाटील मुरूमकर ज्यांना शिवराज पाटील चाकूरकरांचे मानसपुत्र म्हणून ओळखले जात होते. राजकीय घडामोडी प्रत्येक वेळी चाकूरकरांनी बसवराज पाटील मुरूमकर यांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न केला होता. तरी देखील आता बसवराज पाटील भाजपमध्ये गेले आहेत. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हेही भाजपमध्ये जाऊन खासदार झाले आहेत. त्यामुळे अर्चना पाटील चाकूरकर यांनी दृढ निश्चय करून भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याचे निश्चित केले असावे, त्यासाठी त्यांनी भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. सध्या काँग्रेसमध्ये मोठी पडझड चालू असून उदगीर तालुक्यातून ही अनेक जण भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत. काही जण भाजपमध्ये सरळ सरळ न जाता भाजपला समर्थन देणाऱ्या अजित पवार गटाकडे जाणे पसंत करत आहेत. अर्थात उदगीर विधानसभा मतदारसंघाचे नेते राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्या प्रचंड विकास निधीचा वाटा आपल्याला मिळावा, अशा लालसेनेही काही विकास निधीचे लाभार्थी राष्ट्रवादीमध्ये जात असल्याची जोरदार चर्चा सध्या उदगीर शहरात चालू आहे.
कधीकाळी काँग्रेसच्या पाठीचा कणा असलेले उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सिद्धेश्वर उर्फ मुन्ना पाटील यांनी अद्याप काँग्रेसला रामराम ठोकला नसला तरी, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजकारणात देशमुख परिवारांनी केलेली त्यांची गोची लक्षात घेऊन ते सध्या काँग्रेस पासून चार हात दूरच आहेत. असेच काहींशी अवस्था काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस राहिलेले राजेश्वर निटुरे यांची झाली आहे.
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि कृषी उत्पन्न बाजार समिती या दोन्हीही निवडणुकीच्या दरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, उदगीर नगर परिषदेचे सात वेळा नगराध्यक्ष राहिलेले राजेश्वर नीटुरे हे देखील सध्या काँग्रेसवर नाराज असल्याची चर्चा असून ते देखील लवकरच ना. संजय बनसोडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत. तसे तर त्यांना मानणारे बरेच कार्यकर्ते यापूर्वीच राष्ट्रवादीमध्ये गेले आहेत. काँग्रेसची मोठ्या प्रमाणात पडझड चालू असून या सर्व घडामोडीचे परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये निश्चित दिसून येणार आहेत. एखाद्या वेळेस डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर या लातूर शहर विधानसभा मतदार संघाच्या भाजपच्या उमेदवार देखील असू शकतील, तेव्हा मात्र देशमुख परिवाराला ती निवडणूक जड जाणार आहे. अशीही चर्चा आहे. एकंदरीत काँग्रेसचे राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *