सराईत गुन्हेगारांच्या आणखीन तीन टोळ्या लातूर जिल्ह्यातून हद्दपार.
लातूर (एल.पी.उगीले) आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुंड प्रवृत्तीची आणि समाजघातक प्रवृत्तीच्या लोकांना हद्दपार करण्याचा दृढ निर्णय लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून सराईत गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांच्या तीन टोळ्या लातूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आल्या आहेत.
याबाबत याबाबत थोडक्यात माहिती अशी की, पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण, जळकोट व कासारशिरशी तसेच लातूर शहरातील विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत वारंवार गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांविरुद्ध तीन टोळ्यांमधील एकूण 9 गुन्हेगारावर हद्दपारीची (तडीपार) कारवाई करण्यात आली आहे.हद्दपारची कारवाई करण्यात आलेल्याचे नावे अप्पू उर्फ शिवशंकर सुभाष बुकले, (रा. कोराळी वाडी, तालुका निलंगा जिल्हा लातूर),
दत्तात्रय राजेंद्र भोगिले, (रा. कोराळी वाडी,तालुका निलंगा जिल्हा लातूर),
सूर्यकांत दत्तू दगदाडे, (रा. कोराळी वाडी तालुका निलंगा जिल्हा लातूर),
दिगंबर मनोहर डोंगरे, (वय 27 वर्ष, राहणार बोथी तालुका चाकूर. सध्या राहणार गोपाळ नगर उदगीर), मंगेश देविदास जाधव,(वय 26 वर्ष, राहणार पाटोदा तालुका जळकोट),सिद्धार्थ उर्फ श्रीनाथ धनराज ताटवाडे, (वय 25 वर्ष, राहणार रेड्डी कॉलनी उदगीर),श्याम सुंदर माधव खंकरे, (वय 33 वर्ष ,राहणार डोंगरगाव तालुका जळकोट जिल्हा लातूर),समाधान रतन खंकरे, (वय 34 वर्ष, राहणार डोंगरगाव तालुका जळकोट जिल्हा लातूर), सुदर्शन केरबा खंकरे, (वय 33 वर्ष, राहणार डोंगरगाव तालुका जळकोट जिल्हा लातूर).असे असून नमूद आरोपींतावर सन 2019 ते 2023 कालावधीमध्ये त्यांचे राहते ठिकाणाच्या पोलीस ठाणे हद्दीमध्ये मारामारी करणे, दुखापत करणे, गैर कायद्याची मंडळी जमउन मारामारी करणे,जीवे मारण्याची धमकी देणे, परत परत महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांचे उल्लंघन करणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल असून त्याच्यामुळे सामाजिक शांतता धोक्यात आली होती.
आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणुका 2024 च्या अनुषंगाने जिल्ह्यात शांतता अबाधित राहावी, सदरच्या निवडणुका निर्विघ्नपणे पार पाडावे याकरिता नमूद सराईत गुन्हेगारांच्या टोळीकडून कोणत्याही प्रकारचे गैरकायदेशीर कृत्य घडू नये, याकरिता उदगीर ग्रामीण, जळकोट व कासारशिरशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार महाराष्ट्र दारूबंदी, मालमत्ता विषयी व शरीराविषयी गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करून सामाजिक शांतता भंग करणाऱ्या गुन्हेगाराला 1 वर्षासाठी हद्दपार (तडीपार) करण्यात आले असून नमूद टोळीतील सदस्यांना दिनांक 28 मार्च रोजी पर्यंत लातूर जिल्ह्याच्या हद्दीच्या बाहेर सोडण्यात आले आहे.
यासंदर्भात पोलीस ठाणे उदगीर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अरविंद पवार, पोलीस ठाणे जळकोटचे पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे, पोलीस ठाणे कासार शिरशी चे सहाय्यक पोलीस निरीक्षक रियाज शेख यांनी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले व पोलीस अमलदार प्रदीप स्वामी यांचे मदतीने नमूद आरोपींच्या टोळी विरुद्ध सविस्तर हद्दपार प्रस्ताव तयार करून पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्याकडे पाठविले होते. त्यावर पोलीस अधीक्षकांनी सदर प्रस्तावांचे अवलोकन करून नमूद टोळीतील सदस्यामुळे सामाजिक शांतता व आगामी लोकसभा निवडणुका मध्ये अडथळा निर्माण होण्याची शक्यता असल्याने नमूद टोळीतील सदस्यांना मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 55 अन्वये लातूर जिल्ह्यातून हद्दपार (तडीपार) करण्यात आले आहे.
सदर कारवाईच्या माध्यमातून गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या सराईत गुन्हेगार, उपद्रवी लोकांवर जरब बसवण्यासाठी गुन्हेगाराला जिल्ह्यातून हद्दपार केल्यामुळे इतर गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यां गुन्हेगारांना चांगलाच दणका बसला आहे.