सरदार वल्लभभाई पटेल शाळेत स्वयंशासन दिन उत्साहात साजरा
उदगीर (एल.पी.उगीले) राष्ट्रीय ज्ञान विकास मंडळ उदगीर द्वारा संचलित सरदार वल्लभभाई पटेल सेमी इंग्रजी विभागात हरिश्चंद्र कक्षातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्षातील एक उपक्रम म्हणून स्वयंशासन विद्यालयात साजरा केला. गौरवी गुंडरे हिने मुख्याध्यापिका म्हणून शालेय कामकाज पाहिले, आणि एक दिवशीय प्रशासन चालवले. सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच शिक्षकांना वर्गावरील जबाबदारीच्या सूचना दिल्या.अतिशय सुंदर शालेय परिपाठ साईनाथ कपाळे यांनी घेतला. परिपाठामध्ये पद्य प्रार्थना संध्या खड्डे हिने सादर केले. परिपाठामध्ये पर्यवेक्षक वैष्णवी पाटील यांनी बातम्या सांगितल्या. सेमी इंग्रजी विभाग प्रमुख आदरणीय सौं.आशाताई बेंजरगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्याप्रसंगी त्या म्हणाल्या की, यशस्वी जीवनाची पायाभरणी ही शालेय शिक्षणातूनच होते.पुढील काळात उच्च शिक्षण घेताना निश्चित ध्येय डोळ्यासमोर ठेवूनच पुढील वाटचाल केली पाहिजे. विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिनातील सहभाग, शिक्षक होण्याचा अनुभव देणारा नसून भविष्याला आकार देणारा आहे. एकदिवसीय अनुभव आनंद वाढवणारा असतो. तसेच भविष्यात यशाची दिशादर्शक ठरतो, म्हणून विद्यार्थी ही आठवण आयुष्यभर जपतात.स्वयंशासन दिनानिमित्त शिक्षक म्हणून एक दिवशीय कार्याचा अनुभव लेखी स्वरुपात अहवाल कार्यालयात जमा करून भावी विद्यार्थ्यांना देशा दाखवा. असे सखोल मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. इयत्ता सातवी हरिश्चंद्र कक्षातील विद्यार्थ्यांनी एलकेजी ते सहावी या वर्गाला अध्यापन केले. त्यामध्ये अक्षरा कांबळे, भाग्यश्री कलबुर्गे, प्रतीक्षा चव्हाण, वेदिका मंगनुरे, ज्योती भंडे, अनन्या पाटील, अक्षरा थोटे,उजेर हुसेनी, कृष्णा दिंडे, वैष्णवी पाटील, विद्या पाटील प्रभू रामचंद्र मोरखंडे, आदित्य पैदापुरे,सोहम गोंडगावे वेदिका क्षीरसागर, साईनाथ हसनाबादे, गणेश गुंडरे अनन्या घनपाठी, सध्या खडडे मंथन होनराव, संगमेश बिरादार आयान मंगळूरे, सृष्टी याचावाड, शौर्य चोटपगार, स्वरा तोरणेकर, सार्थक शिंदे या सर्व एकदिवशीय शिक्षकांनी विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण ओळखून आपापल्या विषयानुसार वर्गात अध्यापन केले. सचिन शेरे यांनी युकेजीच्या विद्यार्थ्यांचा अतिशय सुंदर खेळ घेतला. स्वयंशासन दिनाचे पूर्ण नियोजन सेमी इंग्रजी विभाग प्रमुख सौं. आशाताई बेंजरगे यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता सातवी हरिश्चंद्र कक्षाचे वर्गशिक्षक रविकुमार रोडगे यांनी स्वयंशासन दिनाचे सुंदर नियोजन केले. मुलांना शिकत असतानाच जबाबदारीची जाणीव व्हावी, शिक्षकांचे कष्ट समजावेत, हाच स्वयंशासन दिन साजरा करण्या मागचा एकमेव उद्देश आहे असे सांगितले.