लोकसभा निवडणूकीत मतदान कर्तव्य बजावावे
लातूर (एल.पी.उगीले) : मोहगाव (खा) या गावात स्वीप कलापथकाच्या माध्यमातून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी पारंपारिक लोकगीतांच्या माध्यमातून गावातील सुजान नव मतदारांनी शंभर टक्के मतदान करण्यासाठी गावात स्वीप पथकातर्फे जाहीर आवाहन करण्यात आले.गावातील वयोवृद्ध मतदार मोठ्या प्रमाणात उपस्थिती नोंदवली.
लातूर जिल्हातील मतदार बंधू भगिणीमध्ये मतदान जनजागृती निर्माण व्हावी, यासाठी स्वीप कलापथकाद्वारे प्रबोधात्मक लोकगीतातून लातूर लोकसभा मतदारसंघातील मतदानाचा टक्का वाढवा. यासाठी जनजागृती करण्यात आली.
या अभियानांसाठी जिल्हाधिकारी वर्षा घुगे-ठाकुर, सहाय्यक निवडणूक अधिकारी मंजुषा लटपटे,अहमदपूर चे तहसीलदार शिवाजी पालेपाड,चाकूर चे तहसीलदार नरसिंग जाधव, गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे,जयसिह जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघात स्वीप पथक जनजागृती करत आहे.
सदरील कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वीप पथक प्रमुख महादेव खळुरे, शिवकुमार गुळवे,मोहन तेलंगे,नागनाथ स्वामी,बस्वेश्वर थोटे,श्रीमती अर्चना माने यांच्यासह मोहगाव खानापुरचे तलाठी सौदागर वैदय,ग्रामसेवक शेषेराव रेडेवार,कोतवाल बालाजी दहिफळे, प्रतिष्ठित नागरिक विठ्ठल सिरसाठ, नाथराव तुडमे,नरसिंग सिरसाठ,संभाजी चव्हाण,नवनाथ देवरकुंटे,भानुदास सिरसाठ,बाबुराव वाघमारे आदिसह वयोवृद्ध मतदार बांधव मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
कार्यक्रमाचे प्रास्तविक नागनाथ स्वामी यांनी केले तर उपस्थितीतांचे आभार पुरुषोत्तम काळे यांनी मानले.