शहीद भगतसिंग प्रतिष्ठानच्यावतीने १११ युवकांचे रक्तदान
कॅप्टन कृष्णकांत कुलकर्णी यांच्या मातोश्रींच्या हस्ते उद्घाटन
अहमदपूर (गोविंद काळे) : शहीद दिनानिमित्त शहीद भगतसिंग सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने शिवाजी चौकात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले त्यात १११ युवकांनी रक्तदान करून सामाजिक उपक्रमात सहभाग नोंदवला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशिक्षणार्थी आयपीएस नवदीप अग्रवाल होते तर प्रमुख पाहुण्या म्हणून उदगीर येथील शहीद कॅप्टन कृष्णकांत कुलकर्णी यांच्या मातोश्री श्रीमती ललिताबाई चंद्रकांत कुलकर्णी होत्या यावेळी
व्यासपीठावर मीनाक्षीताई शिंगडे नगरसेवक बसवेश्वर पुणे कृष्णा चाटे सह मान्यवर होते.
यावेळी शहीद माता श्रीमती कुलकर्णी यांनी देशसेवेपेक्षा कोणतीही सेवा मोठी नाही पण आजच्या काळात प्रत्येक जण सीमेवर जाऊन लढू
शकत नाही त्यामुळे प्रत्येक जण कॅप्टन आहे त्यांनी आपल्या परीने भ्रष्टाचार मुक्त जीवन सामाजिक स्वास्थ व व्यसनमुक्ती असे कार्यक्रम घेतले तर ते देश भक्तीचाच एक भाग आहे त्यामुळे सर्व युवकांनी कॅप्टनचा आदर्श घेऊन देशासाठी काहीही करण्याची तयारी ठेवावी असे आव्हाने यावेळी केले अध्यक्ष समारोपात प्रशिक्षणार्थी पोलिस निरीक्षक नवदीप अग्रवाल यांनी मी फिरोजपुर चां असून शहीद भगतसिंग यांना फाशीची शिक्षा झाल्यानंतर इंग्रजांनी त्यांचा मृतदेह लोकास दृष्टी पडू नये म्हणून ज्या सतलज नदीत सोडला तिथून तो फिरोजपुर या ठिकाणी आला आणि त्याच ठिकाणी शहीद भगतसिंगाचे भव्य स्मारक उभारण्यात आले आहे त्या भूमि तीलच मी असल्यामुळे मला या देशभक्तांचा अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष देवानंद गोरे पंकज पांचाळ बबलू पुणे अक्षय गुट्टे सूर्यवंशी गजानन अनिल हल्लाळे बबन भाऊ बेंबडे धनंजय गुट्टे सोमनाथ पुणे गिरीशंकर संतोष काढवदे पप्पू पंडगे नवनाथ पुणे प्रकाश शिंगडे सोनू काढबदे प्रताप गवळी गोकुळ उमाटे अंगत जाधव जगरूप कराड कृष्णा कांबळे रुपेश कांबळे रणजीत राठोड सह सामाजिक प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते यांनी प्रयत्न केले.