जागरूक नागरीक होऊ या, अभिमानाने मत देवू या..
(स्वीप पथकातर्फे विविध घोषवाक्याने जनजागृती)
अहमदपूर (गोविंद काळे) : लातूर लोकसभा विभागाच्यावतीने जिल्हातील मतदार बंधू भगिणीमध्ये जनजागृती निर्माण व्हावी यासाठी स्वीप कलापथकाद्वारे चाकूर व अहमदपूर तालुक्यातील 96 गावामध्ये प्रबोधनात्मक लोक गीते,भारुड,गोंधळ,पोवाडा,
गवळण अशा गीताच्या माध्यमातून तसेच पथनाट्यातून जनजागृती करण्यात येत आहे.
लातूर लोकसभा मतदारसंघातील मतदानाचा टक्का वाढवा यासाठी जनजागृती करण्यात येत असून
यावेळी सकाळी 10 वाजता नागझरी व सायंकाळी 7 वाजता खंडाळी या गावातील मतदारांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यात आले.व शंभर टक्के मतदान करावे असे जाहीर आवाहन स्वीप पथकातर्फे करण्यात आले.
निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा म्हणजे मतदान, त्यात नागरिकांना मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविण्याची गरज आहे.लोकशाहीत नागरिकांना मतदानाचा हक्क दिला आहे. तो केवळ हक्क नसून आपले कर्तव्य सुद्धा आहे.
जागरूक नागरीक होऊ या , अभिमानाने मत देवू या..,मतदार राजा जागा हो,लोकशाहीचा धागा हो..अशा विविध घोषणाने जनजागृती करण्यात आले.
या अभियानांसाठी जिल्हाधिकारी वर्षा घुगे-ठाकुर मॅडम सहाय्यक निवडणूक अधिकारी मंजुषा लटपटे,अहमदपूर चे तहसीलदार, शिवाजी पालेपाड,चाकूर चे तहसीलदार नरसिंग जाधव, गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघात स्वीप पथकाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. सदरील कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वीप पथक प्रमुख महादेव खळुरे,शिवकुमार गुळवे,मोहन तेलंगे,नागनाथ स्वामी,बस्वेश्वर थोटे,श्रीमती अर्चना माने,चंद्रकांत पेड,पुरुषोत्तम काळे यांच्यासह नागझरी व खंडाळी गावातील तलाठी ,ग्रामसेवक व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे प्रास्तविक बस्वेश्वर थोटे तर उपस्थितीतांचे आभार महादेव खळुरे यांनी मानले.गावातील सुजान मातदार बांधव,महिला मतदार भगिणिनी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाला उपस्थितीत होते.