लोकशाही बळकट करण्यासाठी सर्व मतदार बंधूनी मतदान करावेत!
(स्वीप पथकाकडून कडमुळी येथे मतदार जनजागृती )
चाकूर (गोविंद काळे) : लातूर लोकसभा सार्वत्रिक निवडणूक सन 2024 साठी जिल्हातून जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करुन आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावेत. 7 मे रोजी 100% मतदान करुन आपल्या जिल्हाचे नाव उंचवावेत असे आवाहन अहमदपूर चाकुरचे स्वीप कला पथकाद्वारे विविध लोकगीतातून सांगण्यात आले.तसेच
स्वीप जनजागृती कार्यक्रमात प्रबोधनात्मक घोषवाक्याचे फलक मतदार बांधवाच्या हातात देऊन घोषणा देण्यात आले.
या अभियानांसाठी जिल्हाधिकारी वर्षा घुगे-ठाकुर मॅडम सहाय्यक निवडणूक अधिकारी मंजुषा लटपटे,अहमदपूर चे तहसीलदार शिवाजी पालेपाड,चाकूर चे तहसीलदार नरसिंग जाधव, गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघात जनजागृती कार्यक्रम करण्यात येत असून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वीपचे सदस्य महादेव खळुरे,शिवकुमार गुळवे,मोहन तेलंगे,नागनाथ स्वामी,बस्वेश्वर थोटे,पुरुषोत्तम काळे,श्रीमती अर्चना माने,प्रमोद हुडगे,धनंजय नाकाडे,विरभद्र बावगे यांच्यासह कडमुळी येथिल ग्रामसेवक सुशील
गायकवाड,छायाचित्रकार वैभव कांबळे व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.यावेळी गावातील मतदार बंधू भगिणिनी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाला उपस्थितीत होते.