चिखली येथिल मतदारांनी लोकसभा निवडणूकीत 100% मतदान करावे -सहाय्यक निवडणूक अधिकारी मंजुषा लटपटे

0
चिखली येथिल मतदारांनी लोकसभा निवडणूकीत 100% मतदान करावे -सहाय्यक निवडणूक अधिकारी मंजुषा लटपटे

चिखली येथिल मतदारांनी लोकसभा निवडणूकीत 100% मतदान करावे -सहाय्यक निवडणूक अधिकारी मंजुषा लटपटे

(चिखली येथे स्वीप पथकाद्वारे मतदार जनजागृती )

अहमदपूर (गोविंद काळे) : लातूर लोकसभा सार्वत्रिक निवडणूक सन 2024 साठी चिखली गावातून 7 मे रोजी 100% मतदान करुन आपल्या जिल्हाचे नाव उंचवावेत असे दि.26 रोजी सायंकाळी स्वीप जनजागृती कार्यक्रमात गावीतील सुजाण मतदार बांधवांना सहाय्यक निवडणूक अधिकारी मंजुषा लटपटे यांनी आवाहन केले.

अहमदपूर तहसील कार्यालयाच्या वतीने स्वीप कला पथकाद्वारे विविध लोकगीतातून जनजागृती करण्यात आली.यावेळी नव मतदार तरुण बांधवांनी निवडणूकीच्या काळात आपल्या गावातील वृद्ध मतदार आज्जी-आजोबांचे मतदान करुन घ्यावेत असे मत मांडले.तहसीलदार शिवाजी पालेपाड यांनी अपंग मतदार व 85 वर्ष पुर्ण झालेल्या मतदार बांधवांना मतदानाचा हक्क बजावून राष्ट्रीय कर्तव्य निभवावेत असे आवाहन केले.स्वीप जनजागृती कार्यक्रमांतर्गत चाकूर व अहमदपूर तालुक्यातील 96 गावामध्ये ही जनजागृती करण्यात येणार आहे असे मत मांडले.
या अभियानांसाठी जिल्हाधिकारी वर्षा घुगे-ठाकुर मॅडम सहाय्यक निवडणूक अधिकारी मंजुषा लटपटे,अहमदपूरचे तहसीलदार शिवाजी पालेपाड व चाकूरचे तहसीलदार नरसिंग जाधव, गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघात जनजागृती कार्यक्रम करण्यात येत असून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वीपचे सदस्य महादेव खळुरे,शिवकुमार गुळवे,मोहन तेलंगे,नागनाथ स्वामी,बस्वेश्वर थोटे,पुरुषोत्तम काळे,श्रीमती अर्चना माने,चंद्रकांत पेड यांच्यासह मंडाळाधिकार श्रीमती सुनिता ताटीपामुलवार,तलाठी दिंगाबर मेंडके,चिखली गावातील प्रतिष्ठित नागरिक गावातील मतदार बंधू भगिणिनी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाला उपस्थितीत होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *