यशवंत विद्यालयाचे ओलंपियाड परीक्षेत नेत्रदीपक यश
अहमदपूर (गोविंद काळे) : सायन्स ओलंपियाड परीक्षा नवी दिल्ली च्या वतीने माहे डिसेंबर 2023 मध्ये घेण्यात आलेल्या सायन्स ओलंपियाड आणी मॅथ ओलंपियाड परीक्षेत यशवंत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केलेले आहे.
इयत्ता सहावी ते दहावीपर्यंतचे विद्यार्थ्यांमध्ये 30 विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक मिळविले असून मॅथ ओलंपियाड परीक्षेत 22 विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक मिळवण्यात यशस्वी झाले .
या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा प्राचार्य गजानन शिंदे यांच्या हस्ते गोल्ड मेडल व सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
या परीक्षेचे वैशिष्ट्य म्हणजे ही परीक्षा फक्त इंग्रजी माध्यमांच्या शाळेत घेतली जाते परंतु पहिल्यांदाच या परीक्षेला बसून मुलांनी नेत्रदीपक यश संपादन केलेले आहे.
या विद्यार्थ्यांना यशवंत कोटा पॅटर्नचे प्रमुख खय्युम शेख यांचे व त्यांच्या टीमचे विशेष मार्गदर्शन लाभले होते.
या नेत्रदीपक यशाबद्दल टागोर शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉक्टर अशोक सांगवीकर, सचिव शिक्षण महर्षी डी बी लोहारे गुरुजी, मुख्याध्यापक गजानन शिंदे, उप मुख्याध्यापक राजकुमार घोटे, पर्यवेक्षक अशोक पैद्येवाड, राम तत्तापुरे, कोटा पॅटर्नचे प्रमुख खय्यूम शेख यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन आणि कौतुक केले आहे.