डॉ नरसिंह भिकाणे यांना भारत गौरव राष्ट्रप्रेरणा 2024 हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
अहमदपूर (गोविंद काळे) : महाराष्ट्र राज्याच्या ‘लेक लाडकी अभियान’ च्या वतीने दिला जाणारा ‘भारत गौरव राष्ट्र प्रेरणा 2024’ हा राष्ट्रस्तरीय पुरस्कार लातूर जिल्ह्यातील वर्षानुवर्षे जनआंदोलन व चळवळीत अग्रगण्य असणारे अहमदपूर तालुक्यातील मानखेड येथील रहीवाशी असलेले मनसे लातुर जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाणे यांना जाहीर झाला आहे.या पुरस्काराचे वितरण अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत,लोकमान्य सभागृह, आझाद मैदान, मुंबई येथे होणार आहे.हा पुरस्कार त्यांना सर्वसामान्य जनतेच्या समस्यांवर गेली दोन तप ते करत असलेल्या सातत्यपूर्ण आंदोलने तसेच अडचनीतील कुटुंबांना न्याय व मदत करण्याच्या त्यांच्या कार्याचा आदर्श तरुणांनी घ्यावा यासाठी जाहीर केलेला आहे.याबद्दल डॉ भिकाणे यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.