श्यामर्य कन्या शाळेत कार्यक्रम

श्यामर्य कन्या शाळेत कार्यक्रम

उदगीर : राजर्षी शाहु महाराज यांच्या जयंतीनिमित्त येथील श्यामार्य कन्या विद्यालयात शनिवारी पालकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका तृप्ती पंडित, श्यामलाल प्राथमिकचे मुख्याध्यापक व्ही. एम. उगीले तसेच पालक सूनिताताई बामणे, अश्विनी गव्हाणे, स्वाती बाकले, वंदना गायकवाड यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. एन व्ही. कांबळे, सतनप्पा हुरदळे ,संगीता खादीवाले, संगीता सुतार, सारिका कुलकर्णी, वैशाली अनकल्ले, स्वाती मोरतळे, श्रीहरी निडवंचे , अमोल घुमाडे आदींची उपस्थिती होती.यशस्वीतेसाठी माधव कांबळे, विजय बैले, संतोष कोयले, राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख माणिकराव कांबळे तसेच सेवक हनमनलु पुल्लागोर, समाधान कांबळे आदींनी पुढाकार घेतला.

About The Author

error: Content is protected !!