सामाजिक न्यायाची मुहूर्तमेढ शाहू राजांनी रचली – अँड.दत्ता पाटील

सामाजिक न्यायाची मुहूर्तमेढ शाहू राजांनी रचली - अँड.दत्ता पाटील

 उदगीर (प्रतिनिधी) : लोक कल्याणकारी लोक राजा राजर्षी शाहू महाराज यांनी समाजातील सर्व स्तरातील लोकांना न्याय मिळाला पाहिजे. या भूमिकेतून काम केले. सर्व समान आहेत ही भावना समाजामध्ये रुजवली. त्यामुळे सामाजिक न्यायाचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून राजर्षी शाहू महाराज यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या कार्याचा आदर्श आणि प्रेरणा घेऊन काम केल्यास नव्या पिढीला ऊर्जा प्राप्त होऊ शकेल. तसेच सामाजिक जाणीव जपण्याचे सामर्थ्य निर्माण होईल. असे विचार विधिज्ञ तथा नगरसेवक दत्ता पाटील यांनी व्यक्त केले.

 ते उदगीर येथील छत्रपती शाहू नागरी सहकारी पतसंस्था येथे आयोजित छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. याप्रसंगी संस्थेचे सचिव बालाजी मुरकुटे, संचालक प्रकाश भुरे, संदीप शिंदे, कर्मचारी योगेश मुंडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना शाहू महाराजांच्या एकूण कार्यकर्तृत्वाचा आढावा  त्यांनी घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन योगेश मुंडे यांनी केले.

About The Author